Government schemes : सरकारची फायदेशीर योजना, घरबसल्या मिळेल हजारोंची पेन्शन; कसे ते जाणून घ्या

Government schemes : केंद्र आणि राज्य सरकार सर्वसामान्य लोकांसाठी अनेक योजना सुरु करत असते. यापैकी अशा काही योजना आहेत ज्याद्वारे तुम्हाला घरबसल्या पेन्शन मिळेल. पण अनेकांना सरकारच्या या योजनेची माहिती नसते, त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.

या लोकांसाठी फायदेशीर आहे योजना

पंतप्रधान श्रम योगी मानधन योजनेबद्दल बोलायचे झाले तर ही योजना विशेषत: असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी सुरू केली होती. अशा वेळी जर तुमच्या पगारातून पीएफ कापला गेला किंवा तुम्ही ईएसआयसीचा लाभ घेतला असल्यास तुम्हाला या योजनेत सामील होता येणार नाही.

तर दुसरीकडे, जर तुमचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असल्यास तुम्ही बांधकाम कामगार, रस्त्यावर विक्रेता, घरगुती कामगार, स्थलांतरित मजूर, शेतमजूर असाल किंवा तुमचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा कमी असणार आहे. त्यामुळे अशा वेळी तुम्ही या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र समजले जाते.

आवश्यक कागदपत्रे

जर तुम्हाला या पीएम श्रम योगी मानधन योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास तुम्हाला अर्जाच्या वेळी काही कागदपत्रांची गरज आहे. अर्जदाराला त्याचे बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा आणि सक्रिय मोबाइल क्रमांक गरजेचा असणार आहे.

तुम्हाला या योजनेत अर्ज करायचा असल्यास योजनेबद्दल जास्त माहिती हवी असेल किंवा योजनेबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाणून घ्यायची असतील तर तुम्हाला labour.gov.in/pm-sym या योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागणार आहे. या ठिकाणी तुम्हाला योजनेबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment