Government schemes : मिनी ट्रॅक्टर आणि कृषी उपकरणावर सरकार देतंय 90% अनुदान, त्वरित घ्या लाभ

Government schemes : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरु करत असते. ज्याचा फायदा देखील शेतकऱ्यांना होतो. सरकारने अशीच एक योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर आणि कृषी उपकरणावर 90% अनुदान दिले जात आहे.

महाराष्ट्र सरकार छोट्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मालक बनवत आहे. या योजनेंतर्गत अल्प शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि सहाय्यक कृषी उपकरणांवर 90 टक्के अनुदान देण्यात येत आहे. हे लक्षात घ्या की शेतकऱ्यांना ट्रॅक्टर किंवा कृषी उपकरणे खरेदी करण्यासाठी केवळ ३५ हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. उरलेली रक्कम महाराष्ट्र सरकार देईल. या मिनी ट्रॅक्टर योजनेद्वारे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकार पाऊल उचलत आहे.

मिळेल या उपकरणांवर सबसिडी

हे लक्षात घ्या की महाराष्ट्राच्या समाजकल्याण विभागाने ही योजना सुरू केली असून मिनी ट्रॅक्टर योजनेंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध गटातील शेतकरी कुटुंबांना ९०% अनुदानावर छोटे ट्रॅक्टर आणि सहाय्यक कृषी उपकरणे मिळतील.

महाराष्ट्र सरकार 3 लाख 15 हजार रुपयांची आर्थिक मदत देईल. शेतकऱ्याला फक्त 10 टक्के रक्कम जमा करावी लागणार आहे, जी फक्त 35 हजार रुपये असेल. पात्र शेतकऱ्यांना कल्टिव्हेटर, रोटाव्हेटर, ट्रेलर आणि मिनी ट्रॅक्टरवर अनुदान देण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे

  • मतदार ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोबाईल नंबर
  • बँक पासबुकची छायाप्रत
  • जात प्रमाणपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • गट सदस्यांचे प्रमाणपत्र

असा करा अर्ज

मिनी ट्रॅक्टर आणि सहाय्यक कृषी उपकरणांवर अनुदान मिळविण्यासाठी https://mini.mahasamajkalyan.in या वेबसाइटवर अर्ज करावा लागेल. या योजनेशी संबंधित तपशीलवार माहितीसाठी तुम्हाला https://sjsa.maharashtra.gov.in/mr या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. अर्ज करणारे शेतकरी मदतीसाठी आपापल्या जिल्ह्यातील सहाय्यक समाज कल्याण आयुक्तांशीही संपर्क साधू शकतात.

Leave a Comment