Government scheme । लाडकी बहीण योजनेसाठी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय, होणार आर्थिक फायदा

Government scheme । राज्यात मागील काही दिवसांपासून “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. सरकारच्या या योजनेमुळे राज्यातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

या योजनेची नीट अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य सरकारने आता एक मोठं पाऊल उचललं आहे. सरकारने लाडकी बहीण योजना राबवण्यासाठी 2 समित्या स्थापन केल्या आहेत. ही योजना काटेकोरपणे राबवण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचललं आहे.या समित्या आता अंमलबजावणीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहेत.

हे लक्षात घ्या की कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणाऱ्या पात्र महिलांकडून ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज भरून घेतले जातील. पात्र महिलांच्या बँक खात्यावर जुलैपासून दरमहा दीड हजार रुपये जमा होतील. अर्ज भरण्यासाठी नारी शक्ती दूत ॲप असून अंगणवाडी तसेच सेतू केंद्र तसेच तहसील कार्यालयात येणाऱ्या महिलांना मार्गदर्शन केले जात आहे.

अंगणवाडी सेविकेला १० हजार ५०० रुपये, तर अंगणवाडी मदतनिसाला ५ हजार रुपये मानधन देण्यात येत आहे. एवढ्या मानधनात घरखर्च भागविणे कठीण असल्याने लाडकी बहीण योजनेसाठी ५० रुपये व्यतिरिक्त्त देणार असल्याची घोषणा केली आहे. पण ५० रुपये कमी असून मानधन वाढवावे, अशी मागणी अंगणवाडी सेविका करत आहे.

दरम्यान, या योजनेसाठी राज्य सरकारने एक वेबसाईट आणि मोबाईल ॲप्स तयार केले आहे. पण वेबसाईट आणि मोबाईल ॲप्सवर अर्ज भरताना अडचणी येत आहेत. जरी आता या योजनेची वेबसाईट सुरळीत सुरू नसली तरी ऑफलाईन पद्धतीने 31 ऑगस्टपर्यंत आलेले सर्व अर्ज स्वीकारले जाणार आहेत, याबाबत राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी माहिती दिली आहे. महिलांसाठी चांगली योजना राबवली आहे. या योजनेतून कुठलीही महिला वंचित राहणार नाही, त्यामुळे ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. याचा फायदा महिलांना होईल.

Leave a Comment