Government Jobs Update: नागपूर (Nagpur): प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी केंद्रात १० लक्ष नोकरी भरतीचे लक्ष ठेवले असून राज्य शासनालाही अशावेळी मैदानात उतरावे लागेल. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारची चालू वर्षभरात ७५ हजार युवकांना सरकारी नोकरी (government jobs to 75 thousand youths) देण्याची योजना आहे. त्याची सुरुवात लवकरच १८ हजार युवकांची पोलीस दलामध्ये भरती करून तसेच १० हजार युवकांची ग्रामविकास विभागातील भरतीद्वारे केली जाणार आहे.
- Good News for Student: विद्यार्थ्यांना मिळणार ‘त्याचे’ही शिक्षण; पहा काय निर्णय घेतलाय विद्यापीठाच्या कुलगुरू यांनी
- Dairy Farmers Diwali Milk Bonus: सोसायटी शेतकऱ्यांना लाखोंचा बोनस; पहा कुठे घडत आहे हे अक्रीत
- Diwali-Holi Celebration: दिवाळीत केली होळी; म्हणून असे केले हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी
दीपोत्सवाच्या (Deepotsava) पर्वावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी नागपूर अजनी परिसरात सेंटर रेल्वे कम्युनिटी हॉलमध्ये (Center Railway Community Hall in Nagpur) येथे आयोजित कार्यक्रमात ही महत्वाची माहिती दिली आहे. एकूणच केंद्र आणि राज्यातील भाजपचे सरकार आता तरुणांना सरकारी नोकरी (Sarkari Nokari) देण्यासाठी सरसावले असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झालेले आहे. मात्र, ही योजना सत्यात येणार किंवा नाही याकडे राज्याचे लक्ष आहे. कारण, यापूर्वी अनेकदा अशा घोषणा हवेत विरल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारनेही (Maha Vikas Aghadi government) अशाच आश्वासनांची खैरात करून भरती प्रक्रिया बंद ठेवली होती. यावेळी या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक ऋचा खरे, आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर उपस्थित होते. (Union Social Justice Minister Ramdas Athavale, Divisional Railway Manager of Central Railway Richa Khare, MLA Praveen Datke, MLA Krishna Khopde, MLA Vikas Kumbhare, Collector Dr. Vipin Itankar)
केंद्र शासनामार्फत पुढील १८ महिन्यात १० लाख तरुणांना विविध शासकीय विभागामध्ये नोकरी दिली जाणार असून नागपूर येथे २१३ युवकांना नियुक्तीपत्र (appointment letters) देण्यात आले. बँक, रेल्वे, पोस्ट, इन्कम टॅक्स (Central Government including Bank, Railway, Post, Income Tax) यासह केंद्र शासनाच्या जवळपास ३८ विभागांमध्ये ही नियुक्ती होणार आहे. फडणवीस म्हणाले की, राज्यातील खासगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी आहे. खासगी क्षेत्रातील व्यावसायिकांना ज्या पद्धतीचे कौशल्य हवे आहे, त्या पद्धतीच्या कौशल्य निर्मितीचा प्रयत्न सुरू आता आहे. खासगी क्षेत्रातील नोकऱ्या मोठ्या संख्येने मिळाव्यात यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी नोकरी देणारे व नोकरी हवे असणारे यांना एकत्र आणून प्रत्येक जिल्ह्यात, मतदारसंघ निहाय रोजगार मेळावे आयोजित केले जातील. (employers and job seekers.)