Government Job । 10 वी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी, जाणून घ्या अर्जासह पात्रता

Government Job । अलीकडच्या काळात नोकरी मिळवणे आणि मिळालेली नोकरी टिकवणे खूप अवघड झाले आहे. अनेक दिग्ग्ज कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना घराचा रस्ता दाखवत आहेत. त्यामुळे देशात दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण खूप वाढले आहे.

जर तुम्ही दहावी पास असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता सरकारी नोकरी मिळवू शकता. महत्त्वाच्या वेबसाइटवर नोंद करा आणि या तारखेपूर्वी फॉर्म भरा. जाणून घ्या अर्जासह पात्रता.

अर्ज करण्यापूर्वी हे लक्षात घ्या की, ही भरती दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळाकडून करण्यात येत आहे. याअंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफच्या ५६७ पदांवर भरती होणार आहे. या पदासाठी ८ फेब्रुवारीपासून अर्ज स्वीकारले जात आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ मार्च २०२४ आहे, या तारखेपर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता. शेवटच्या तारखेला थोड्या दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे लवकरात लवकर या तारखेपूर्वी अर्ज करा.

हे लक्षात ठेवा की या रिक्त पदांसाठी अर्ज फक्त ऑनलाइन करता येत आहे. हे करण्यासाठी तुम्हाला DSSSB च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल– dsssb.delhi.gov.in. या पदांची निवड परीक्षेच्या अनेक फेऱ्यांनंतर करण्यात येईल. लेखी परीक्षा, डीव्ही फेरी आणि वैद्यकीय परीक्षा याप्रमाणे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असावे. तसेच उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे आहे.

अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. SC, ST, PWBD आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. परीक्षेची तारीख अजून जाहीर झालेली नाही. यासंबंधी कोणतेही अपडेट किंवा तपशील जाणून घेण्यासाठी, वेळोवेळी वर नमूद केलेली वेबसाइट तपासत रहा.

Leave a Comment