Government Bank: मुंबई (Mumbai): केंद्र सरकार चालू आर्थिक वर्ष 2023 मध्ये कोणत्याही सरकारी / सार्वजनिक क्षेत्राच्या बँके मध्ये (PSB) यंदा कोणतीही गुंतवणूक करणार नाही. (Central government will not infuse any capital in public sector banks) फाइनेशियल एक्सप्रेस (Financial Express) यांनी रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2008 नंतर असे प्रथमच होईल, जेव्हा सरकार हे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना भांडवल उपलब्ध करून देणार नाही.
कारण सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आर्थिक वर्ष 2022 मध्ये खूप चांगला नफा नोंदवला आहे आणि त्यांचा NPA (खराब कर्ज / Bad Loan) सातत्याने घटत आहे. सध्या देशातील कोणतीही सरकारी बँक प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शन (PCA / Prompt Corrective Action) अंतर्गत येत नाही. या आर्थिक वर्षात सार्वजनिक बँकांकडे पुरेसा पैसा आहे. कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातील बँकेला (PSB) वाचवण्यासाठी भांडवलाची गरज भासत नाही. तसेच, त्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेता, ते स्वतः बाजारातून भांडवल उभारण्याच्या स्थितीत आहेत.
- British prime minister rishi sunak यांचे ‘ते’ ट्विट चर्चेत; बिफबद्दल त्यांनी म्हटले असे
- Agriculture News: अबब…दिवाळीत महागाईचा धक्का! ग्राहकांच्या खिशाला बसू शकते अधिकची झळ
- म्हणून British prime minister rishi sunak यांनी जारी केले होते गांधीजींचे नाणे; पहा काय होता त्यामागे हेतू
अहवालात म्हटले आहे की केंद्र सरकारने 2022 च्या अर्थसंकल्पात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या पुनर्भांडवलीकरणासाठी सध्या कोणताही निधी राखून ठेवलेला नाही. मात्र, पुरवणी मागण्या मंजूर करून असा निधी वाटप करता येईल. अर्थात आर्थिक वर्ष 2016 ते आर्थिक वर्ष 2021 दरम्यान सरकारने सरकारी बँकांना 3.3 लाख कोटी रुपयांचे वाटप केले होते. परिणामी या बँकांना त्यांचा ताळेबंद आणि कॅपिटल टू रिस्क वेटेड अॅसेट्स (CRAR) सुधारण्यास मदत झाली होती. मार्च 2022 पर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा CRAR 10.87 टक्क्यांच्या आवश्यकतेपेक्षा 14.6 टक्के इतका जास्त होता.
मार्च 2022 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा NPA हा 7.6 टक्क्यांच्या सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर आला होता. बँकांनी आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीत 15,306 कोटी रुपयांचा नफा नोंदवला असून ज्यात 9 टक्के वाढ झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये अर्थसंकल्प सादर करताना IDBI बँकेशिवाय आणखी दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण करण्याची घोषणा केली होती. नुकत्याच जाहीर झालेल्या आर्थिक निकालांमध्ये IDBI बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत तब्बल 828 कोटींचा नफा कमावल्याचे म्हटले आहे. हे मागील एक वर्षापूर्वीच्या तुलनेत 46 टक्के अधिक आहेत. बँकेचे एकूण उत्पन्न 6,605 कोटी आहे, तर NPA 21.85 टक्क्यांवरून 16.51 टक्क्यांवर आला आहे. (IDBI Bank has made a profit of 828 crores in the second quarter of the current financial year)