Google Pixel 8a : 64MP OIS कॅमेरा असणारा Google चा जबरदस्त फोन, लॉन्च होण्यापूर्वी किंमत लीक

Google Pixel 8a : स्मार्टफोन वापरकर्त्यांना Google च्या फोनची चांगलीच भुरळ पडलेली दिसत आहे. कंपनीदेखील बाजारातील मागणी पाहून स्मार्टफोन लाँच करत आहेत. कंपनीच्या प्रत्येक फोनमध्ये आपल्याला शानदार फीचर्स पाहायला मिळत आहेत. अशातच कंपनी आपला एक नवीन फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे.

फीचर्स

कंपनी आपला Google Pixel 8a फोन लाँच करणार आहे. टिपस्टरनुसार, या फोनमध्ये 6.1 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले मिळेल. जो 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. या या शानदार फोनमध्ये ऑफर केलेल्या या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस पातळी 2000 nits असणार आहे.

तसेच ही कंपनी डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी गोरिला ग्लास 3 देखील देईल. 188 ग्रॅम वजनाच्या या फोनचा आकार 152.1 x 72.7 x 8.9 मिमी असून हा फोन 8 GB LPDDR5x रॅम आणि 256 GB UFS 3.1 स्टोरेजसह येईल.

इतकेच नाही तर प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये Tensor G3 चिपसेट देईल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरे असणार आहेत. यात 64-मेगापिक्सेलच्या मुख्य लेन्ससह 13-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर पाहायला मिळेल.

कंपनीच्या फोनच्या मागील बाजूस दिलेल्या या दोन्ही सेन्सरमध्ये कंपनी OIS म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन फीचर मिळेल. कंपनीचा हा आगामी फोन 4492mAh बॅटरीसह येईल. ही बॅटरी 27 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

गुगल यात नवीनतम ओएस ऑफर करणार आहे, जे मॅजिक टच-अप, बेटर ग्रिप मॅजिक आणि रिअल टोन सारख्या अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह येईल. विशेष बाब म्हणजे कंपनी या फोनला 7 वर्षांपर्यंत OS अपडेट देईल. बायोमेट्रिक सुरक्षेसाठी तुम्हाला फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर पाहायला मिळेल. लीकनुसार, युरोपमध्ये फोनची किंमत 549 युरो (जवळपास 49 हजार रुपये) असणार आहे. तर फोन बे, लाइम ग्रीन, ऑब्सिडियन आणि पोर्सिलेन या चार रंग पर्यायांमध्ये येईल

Leave a Comment