Google Pixel 8a : काय सांगता? 12 हजारांनी स्वस्तात खरेदी करा गुगलचा नवीन फोन, मिळतील शानदार फीचर्स

Google Pixel 8a : भारतीय बाजारात Google ने आपला नवीन फोन Google Pixel 8a लाँच केला आहे. या फोनची विक्री आजपासून सुरु असून तुम्ही तो सर्वात मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता. पहा संपूर्ण ऑफर.

Google Pixel 8a वर मिळत आहे शानदार ऑफर

Google Pixel 8a फोन आज सकाळी 6:30 पासून विक्रीसाठी उपलब्ध असून कंपनीचा हा शानदार फोन एलो, बे, ऑब्सिडियन आणि पोर्सिलेन अशा चार रंगांमध्ये येतो. तसेच यात फोनमध्ये दोन स्टोरेज पर्याय आहेत: 128GB किंवा 256GB. किमतीचा विचार केला तर 128GB व्हर्जनची किंमत 52,999 रुपये आणि 256GB व्हर्जनची किंमत 59,999 रुपये इतकी आहे.

तर पहिल्या सेलमध्ये उपलब्ध ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास ICICI क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना 3,000 रुपयांची शानदार सवलत मिळते. याव्यतिरिक्त, एक एक्सचेंज ऑफर देखील आहे जिथे तुम्ही निवडक स्मार्टफोन मॉडेल्समध्ये ट्रेडिंग करून 9,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सवलत मिळेल.

याचाच अर्थ असा की या दोन्ही डिस्काउंटचा फायदा तुम्हाला मिळाला तर हा फोन तुम्हाला 12,000 रुपयांहून अधिक स्वस्त होईल. इतकेच नाही तर ग्राहक ते ईएमआयवरही खरेदी करू शकतात. Google Pixel 8a फोन 3,333 रुपये प्रति महिना EMI वर खरेदी केला जाऊ शकतो.

Google Pixel 8a चे फीचर्स

नवीन Google Pixel 8a मध्ये 6.1-इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. Pixel 8a टेन्सर G3 चिपसेटसह येत असून हा चिपसेट Pixel 8 मॉडेलमध्येही आहे. या शानदार फोनमध्ये यूजर्सना लेटेस्ट एआय फीचर्स दिले आहेत. तर कंपनीचा हा फोन 8GB फास्ट LPDDR5x रॅम सपोर्टसह येतो. यात IP67 वॉटर आणि डस्ट रेटिंग आहे.

कंपनीच्या या फोनला 7 वर्षांचे सॉफ्टवेअर आणि सिक्युरिटी अपडेट्स दिले आहेत, ज्यामुळे फोन आणखी वर्षभर नवीन राहील. Pixel 8a मध्ये 64MP मुख्य सेन्सर आहे. सेल्फीसाठी, या फोनमध्ये 13MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 13MP फ्रंट कॅमेरा दिला असून या फोनमध्ये 4492mAh बॅटरी आहे. एका चार्जवर हा फोन २४ तास चालेल असा कंपनीचा दावा आहे.

Leave a Comment