Google Pixel 8 : शानदार संधी! गुगलच्या ‘या’ फोनवर आहे 24 हजारांपर्यंतची सवलत, ऑफर पाहून व्हाल चकित

Google Pixel 8 : जर तुम्ही नवीन फोन खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला आता गुगल फोनवर 24,000 रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. काय आहे खास ऑफर? जाणून घ्या.

50 हजारांपेक्षा स्वस्तात येईल खरेदी करता

समजा तुम्ही 50,000 रुपयांपेक्षा कमी शक्तिशाली फोन शोधत असाल, तर खरेदीदारांसाठी हा उत्तम पर्याय असेल. जो उत्तम कॅमेरा, स्वच्छ सॉफ्टवेअर, वायरलेस चार्जिंग आणि आयपी रेटिंगसह येतो. जर तुम्ही देखील नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

जाणून घ्या Google Pixel 8 ची किंमत

किमतीचा विचार केला तर Google Pixel 8 चे बेस (8GB + 128GB) मॉडेल 63,999 रुपयांना विकले जात आहे. तर त्याचप्रमाणे, 8GB + 256GB व्हेरिएंट 73,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे.

हे हेझेल, मिंट, ऑब्सिडियन आणि रोझ शेड्समध्ये सूचीबद्ध असून खरेदीदार “ICICI बँक क्रेडिट नॉन-ईएमआय, क्रेडिट आणि डेबिट कार्ड ईएमआय व्यवहार” द्वारे खरेदीसह 8,000 रुपयांची सूट घेऊ शकतात. एक्सचेंजबद्दल बोलायचे झाले तर निवडक मॉडेल्सच्या एक्सचेंजवर 4,000 रुपयांची अतिरिक्त सवलत उपलब्ध करून दिली जात आहे. Flipkart Axis Bank कार्डद्वारे फोनवर 5 टक्के कॅशबॅक देखील उपलब्ध आहे.

Google Pixel 8 चे फीचर्स

Google Pixel 8 मध्ये Gorilla Glass Victus सह 6.2-इंच FHD+ OLED 120Hz स्क्रीन आणि 2,000nits ची कमाल ब्राइटनेस असून या फोनमध्ये Tensor G3 आणि Titan M2 सिक्युरिटी कॉप्रोसेसर आहे. नवीनतम Android वर चालणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये, Google ने Pixel 8 सह 7 वर्षांसाठी अपडेट्स देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

इतकेच नाही तर या फोनमध्ये 4,575mAh बॅटरी आहे जी 27W वायर्ड आणि 18W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. या शानदार फोनमध्ये 50MP मुख्य + 12MP अल्ट्रा वाइड बॅक कॅमेरा आणि 10.5MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर चार्जिंगसाठी यात Wi-Fi 6, Bluetooth 5.3, NFC आणि USB Type-C 3.2 पोर्ट दिला आहे.

Leave a Comment