Google Pixel 8 । त्वरा करा! बँक ऑफरशिवाय स्वस्तात खरेदी करा Pixel 8, ‘या’ ठिकाणी मिळतेय संधी

Google Pixel 8 । जर तुम्ही गुगलचा नवीन फोन Google Pixel 8 खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी आता एक आहे. तुम्ही आता हा फोन कोणत्याही बँक ऑफरशिवाय स्वस्तात खरेदी करू शकता. जाणून घ्या संपूर्ण ऑफर.

Google Pixel 8 फ्लिपकार्ट सेलमध्ये लॉन्च झाल्यापासून सर्वात कमी किमतीत खरेदी करता येईल. किमतीचा विचार केला तर या फोनचे 8GB + 128GB मॉडेल केवळ 58,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे तर लॉन्चच्या वेळी त्याची किंमत 75,999 रुपये इतकी होती. फोनचे 8GB + 256GB मॉडेल सर्वात कमी किंमतीत उपलब्ध आहे. सेलमध्ये हा फोन केवळ 68,999 रुपयांना उपलब्ध आहे, तर लॉन्चच्या वेळी त्याची किंमत 82,999 रुपये इतकी होती, म्हणजेच हा फोन थेट 14,000 रुपयांनी स्वस्तात खरेदी करता येईल.

फोन वॉटरप्रूफ IP68 रेटिंगसह येतो. फोनमध्ये 6.2-इंचाचा OLED डिस्प्ले असून तो गोरिल्ला ग्लास विक्टस संरक्षणासह येतो. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप (50+12 मेगापिक्सेल) आहे. तर सेल्फीसाठी फोनमध्ये 10.5 मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल. कंपनीचा हा फोन Tensor G3 प्रोसेसरसह येतो आणि कंपनी त्यावर 7 वर्षांचे संपूर्ण OS अपडेट देईल तर फोनमध्ये 27W वायर्ड आणि 18W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4575 mAh बॅटरी आहे.

Pixel 7 Pro सर्वात स्वस्तात करा खरेदी

Google Pixel 7 Pro लाँच झाल्यापासून सर्वात कमी किमतीत सेलमध्ये खरेदी करता येईल. किमतीचा विचार केला तर फोनचे 12GB + 128GB मॉडेल केवळ 55,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, तर लॉन्चच्या वेळी त्याची किंमत 84,999 रुपये इतकी होती.

फोनमध्ये 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले दिला असून या शानदार फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप (50+48+12 मेगापिक्सेल) आहे. तर सेल्फीसाठी, फोनमध्ये 10.8-मेगापिक्सेल कॅमेरा दिला आहे. फोन Tensor G2 प्रोसेसरसह येतो. फोनमध्ये 4926 mAh बॅटरी दिली आहे.

Leave a Comment