Google Pixel 7 । तब्बल 27 हजारांच्या सवलतीत खरेदी करा गुगलचा ‘हा’ धमाकेदार फोन, मिळतील जबरदस्त फीचर्स

Google Pixel 7 । तुमच्याकडे आता गुगलचा फोन आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे. कंपनीचा सर्वात जास्त विक्री करणारा फोन तुम्हाला तब्बल 27 हजारांच्या सवलतीत खरेदी करण्याची संधी आहे.

सवलतीचा विचार केला तर Google Pixel 7 फ्लिपकार्टवर बंपर सवलतीनंतर रु. 34,999 च्या किमतीत सूचीबद्ध असून हा फोन भारतीय बाजारपेठेत 59,999 रुपयांच्या किंमतीला लॉन्च केला होता. म्हणजेच आता ते 25,000 रुपयांनी स्वस्त विकले जात असून फ्लिपकार्ट GOAT सेलमुळे ही सूट दिली जात आहे. आयसीआयसीआय बँक कार्डद्वारे पेमेंट केले तर या फोनसाठी 2000 रुपयांची अतिरिक्त सूट उपलब्ध आहे.

जर तुम्हाला तुमचा जुना फोन एक्सचेंज करताना Pixel 7 खरेदी करायचा असल्यास आता तुम्हाला या डिव्हाइसवर 20,900 रुपयांपर्यंत एक्सचेंज सवलत मिळू शकते. पण हे लक्षात ठेवा, तुम्ही बँक किंवा एक्सचेंज ऑफरमधून फक्त एक निवडता येईल आणि एक्सचेंज मूल्य जुन्या फोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असते. कंपनीचा हा फोन ऑब्सिडियन, लेमनग्रास आणि स्नो अशा तीन रंग पर्यायांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो.

Google च्या शक्तिशाली कॅमेरा फोनमध्ये उच्च रिफ्रेश-रेट समर्थनासह 6.7-इंचाचा क्वाड HD+ डिस्प्ले दिला असून Google Tensor G2 प्रोसेसर व्यतिरिक्त, Pixel 7 मध्ये 12GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळेल. तर या फोनच्या मागील पॅनलवर 50MP+48MP+12MP सेन्सरसह ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. यात 10.8MP सेल्फी कॅमेरासह 4926mAh बॅटरी आहे.

Leave a Comment