Google News : Google ने मोठी कारवाई करत 1.2 कोटी अकॉऊंट डिलिट केली आहे. Google ने ही कारवाई जाहिराती दाखवण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांवर केली आहे.
माहितीनुसार, Google ने Google ने च्या जाहिरात धोरणाचे उल्लंघन करून वापरकर्त्यांना त्यांच्या जाहिराती दाखवणारी सुमारे 1.2 कोटी अकॉऊंट डिलीट केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मालवेअर आणि फसवणुकीत वाढ झाल्याची माहिती समोर आली होती, तपासणीनंतर जी Google खाती नियमांना बगल देऊन जाहिराती देत होत्या ते काढून टाकण्यात आले आहेत. Google ने आपल्या वार्षिक जाहिरात सुरक्षा अहवालाचा हवाला देत ही माहिती प्रसिद्ध केली आहे.
महाविकास आघाडीला मोठा धक्का, ‘या’ 8 जागांवर प्रकाश आंबेडकर देणार उमेदवार
डीपफेकमुळे आव्हाने वाढली
युजर्सची गोपनीयता आणि सुरक्षिततेशी तडजोड केली जाणार नाही, असे Google चे म्हणणे आहे. जाहिराती दाखवण्याच्या नावाखाली डीपफेकसारखे नवनवीन डावपेच वापरून वापरकर्त्यांची फसवणूक केली जात असल्याची माहिती Google ने दिली आहे.
हे जाणून घ्या कि, काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर सचिन तेंडुलकरचा डीपफेक व्हिडिओ बनवून एक जाहिरात करण्यात आली होती, ज्याबाबत गुगल सतर्क झाले आहे. अशीच भीती लोकसभा निवडणुकीबाबत व्यक्त केली जात आहे, जिथे डीपफेकचा गैरवापर होऊ शकतो.
अखेर, महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, जाणून घ्या कोणाच्या खात्यात कोणती जागा ?
निवडणूक जाहिरातीची पडताळणी सुरू आहे
गुगल निवडणुका पारदर्शक करण्यासाठी काम करत आहे. म्हणूनच 2023 मध्ये 5,000 हून अधिक निवडणूक जाहिराती व्हेरिफाय केल्या आहेत आणि व्हेरिफाय पूर्ण न झालेल्या 7.3 दशलक्षाहून अधिक निवडणूक जाहिराती काढून टाकल्या आहेत. गुगलचे म्हणणे आहे की AI मुळे जाहिरातींची पडताळणी करणे खूपच आव्हानात्मक झाले आहे.