Google Account : सध्या सोशल मीडियावर Google काही लोकांचे YouTube Account डिलीट करणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.
गुगलने याबाबत स्पष्टीकरण देत म्हटले आहे की आम्ही मागच्या दोन वर्षापासून बंद असलेले गुगल अकाउंट डिलीट करणार आहे.
कंपनीने आपली ब्लॉग पोस्ट अपडेट केली आहे, “यावेळी, YouTube व्हिडिओ असलेली खाती काढून टाकण्याची आमची कोणतीही योजना नाही.” असं म्हटले आहे. म्हणून सध्या अनेक वापरकर्त्यांना दिलासा मिळाला आहे की Google ने अद्याप YouTube व्हिडिओंबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही.
या वर्षाच्या अखेरीस, Google खाते किमान 2 वर्षांपासून न वापरले किंवा साइन इन केले नसल्यास, कंपनी Google Workspaces (Gmail, Docs, Drive, Meet, Calendar) आणि त्यातील कंटेंटसह खाते आणि त्यातील कंटेंट हटवू शकते .
ही पॉलिसी फक्त वैयक्तिक Google खात्यांना लागू होते आणि शाळा किंवा व्यवसायांसारख्या खात्यांवर परिणाम करणार नाही. Google ने म्हटले आहे की, जर हे धोरण आता लागू झाले, तर त्याचा परिणाम इन ऍक्टिव्ह असलेल्या वापरकर्त्यांवर होणार नाही आणि डिसेंबर 2023 पासून खाती डिलीट करणे सुरू होईल.