Today Gold Price: देशात आता लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र बाजारात सोन्याचे भाव वाढल्याने अनेकांचे बजेट बिघडले यातच जर तुम्ही देखील सोने खरेदी करण्याच्या विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
आज भारतीय बाजारात सोन्याच्या किमतीमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. यामुळे पुन्हा एकदा बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. माहितीसाठी जाणुन घ्या, सध्या सोने त्याच्या उच्च पातळीच्या दरापेक्षा खूपच स्वस्त विकले जात आहे. ज्याचा फायदा घेत तुम्ही स्वस्तात सोने खरेदी करू शकता.
सोन्याची किंमत जाणून घ्या
सराफा बाजारात सर्व कॅरेट सोन्याचे दर घसरण पाहायला मिळत आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 71, 710 रुपये प्रति दहा ग्रॅम नोंदवला गेला. तर 23 कॅरेट सोन्याचा भाव 71,423 रुपये प्रति तोळा असा ट्रेंड होत आहे.
22 कॅरेट सोन्याची किंमत 65,686 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा दर 53,783 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका नोंदवला गेला आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव 41,950 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
चांदीबद्दल बोलायचे तर चांदी 80,050 रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे.
मिस्ड कॉलद्वारे सोन्याचे दर जाणून घ्या
बाजारात 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या नंबरवर मिस कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुम्हाला एसएमएसद्वारे दराची माहिती सहज मिळेल.