Good News for Student: मुंबई (Mumbai): महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (Maharashtra State Skilled University) यांनी आता रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (RAI / MoU with Retailers Association of India) यांच्याशी सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना या उपक्रमाद्वारे बिझनेस आणि रिटेलचे आवश्यक ज्ञान आणि उद्योगाचा अनुभव (knowledge of business and retail and industry experience) मिळणार आहे. यात बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (BBA / Bachelor of Business Administration retail industry) या अभ्यासक्रमात सर्वकाही शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजगोपालन (Mr. Rajagopalan, Chief Executive Officer) यांनी माहिती देताना म्हटले की, तरुणांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्यासाठी विद्यापीठासोबतचे हे सहकार्य अत्यंत महत्वाचे पाऊल आहे. एकूण किरकोळ उद्योग, महाराष्ट्र राज्य आणि राज्यातील तरुणांच्या भविष्यासाठी हे सकारात्मक पाऊल ठरेल.
- Business Stock News : म्हणून झाली श्री सिमेंटच्या शेअरमध्ये ४ टक्क्यांनी घसरण
- Agriculture News: शेतकऱ्यांना मिळणार सरकारकडून दुहेरी दिवाळी भेट; पहा काय असेल ही भेट
- Agriculture News Update: याने शेतकरी होणार मालामाल; पंतप्रधान मोदींनी ६०० हून अधिक किसान समृद्धी केंद्र केले सुरु
यावेळी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. अपूर्वा पालकर (Vice-Chancellor of Maharashtra State Skills University Prof. Dr. Apoorva Palkar), डॉ. लॉरेन्स फर्नांडिस, गौतम जैन, मीनाक्षी चुडामणी यांच्यासह रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या रिटेल लर्निंगच्या प्रमुखांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर (Heads of Retail Learning, Retailers Association of India including Lawrence Fernandes, Gautam Jain, Meenakshi Chudamani) स्वाक्षरी करण्यात आली. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा प्रारंभ ऑगस्ट 2022 मध्ये झाला असून विद्यापीठाने रोजगाराभिमुख कार्यक्रमांसाठी उद्योगाशी भागीदारी (employment-oriented programmes) सुरू केली आहे. रिटेल उद्योगाशी संबंधित अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण घेतानाच कमावण्याची आणि अनुभव मिळविण्याची संधी मिळेल. तीन वर्षांच्या अखेरीस विद्यार्थ्यांना सहाय्यक स्टोअर व्यवस्थापकांच्या प्रोफाइलमध्ये किरकोळ विक्री उद्योग क्षेत्रात संधी मिळणार असून इयत्ता 12 वी पूर्ण केलेल्या सर्वांसाठी हा अभ्यासक्रम असेल. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट, डिप्लोमा, अॅडव्हान्स डिप्लोमा आणि डिग्री प्रोग्रामचा पर्याय आहे. (Certificate, diploma, advanced diploma and degree programs)
यासह विद्यापीठाने नुकतेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, मशीन लर्निंग, बिझनेस इंटेलिजन्स आणि इनोव्हेशन, न्यू व्हेंचर मॅनेजमेंट मधील टेक्नॉलॉजी डोमेनमधील (courses in the technology domains of Artificial Intelligence, Cyber Security, Machine Learning, Business Intelligence and Innovation, New Venture Management) अभ्यासक्रम सुरू केले आहेत. रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (RAI) ही भारतीय किरकोळ विक्रेत्यांची नोंदणीकृत संस्था आहे. भारतातील आधुनिक रिटेल उद्योगाच्या वाढीसाठी योग्य वातावरण निर्माण करण्यासाठी संस्था काम करते. सामंजस्य कराराद्वारे RAI मोठ्या किरकोळ विक्रेत्यांशी जॉब ट्रेनिंग, इंडस्ट्री फॅकल्टी आणि प्लेसमेंट सपोर्ट प्रदान करण्यासाठी मदत करेल. RAI ने किरकोळ विक्री उद्योगाच्या शिक्षणासंदर्भात कौशल्य सामग्री तयार केली असून ते शैक्षणिक संस्था आणि उद्योगांना उपलब्ध करुन देत आहेत. याबाबत कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर म्हणाल्या की, “रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियासोबतचा हा सामंजस्य करार पदवीधारकांना किरकोळ विक्री क्षेत्रातील आवश्यक कौशल्ये शिकवणार आहे. असे उद्योगाशी संबंधित अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ कटीबद्ध आहे.” (Retailers to provide job training, industry faculty and placement support. RAI has created skill content for retail industry education and is making it available to educational institutions and industry.)