दिल्ली – पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान ( Punjab Chief Minister Bhagwant Mann) शनिवारी राज्यातील जनतेसाठी 300 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा करणार आहेत.1 जुलैपासून पंजाबमधील लोकांना 300 युनिट मोफत वीज मिळणार आहे. ‘आप’ सरकारला एक महिना पूर्ण होत असताना मुख्यमंत्री मान आज त्याची घोषणा करणार आहेत.
भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील आप सरकारला शनिवारीच एक महिना पूर्ण होणार आहे. याआधी गुरुवारी जालंधरमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांनी 16 एप्रिल रोजी पंजाबच्या जनतेला एक मोठी खुशखबर देण्याची घोषणा केली आहे.
पंजाबमध्ये 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याच्या योजनेबाबत मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मंगळवारी दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. याच्या एक दिवस आधी अरविंद केजरीवाल यांनी एक बैठक घेतली आणि मुख्य सचिव अनिरुद्ध तिवारी, ऊर्जा सचिव दिलीप कुमार आणि पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (PSPCL) चे CMD यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
29 जून 2021 रोजी अरविंद केजरीवाल यांनी 300 युनिट मोफत वीज तसेच जुन्या घरांच्या बिलावरील प्रलंबित रक्कम माफ करण्याची घोषणा केली होती. राज्य आधीच कृषी क्षेत्राला मोफत वीज आणि सर्व अनुसूचित जाती, मागास जाती आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना 200 युनिट मोफत वीज पुरवते (2016 मध्ये सुरू केलेली योजना).
याशिवाय 18 वर्षांवरील सर्व महिलांना प्रति महिना 1,000 रुपये देण्याचे आश्वासनही सरकारने दिले आहे. पंजाबमधील विजेची मागणी आधीच 8,000 मेगावॅटच्या आसपास पोहोचली आहे. भात लावणीदरम्यान मागणी सुमारे 15,000 मेगावॅटपर्यंत वाढते.