ICC World Cup 2023: ऑक्टोंबर महिन्यात सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकपूर्वी भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
तुमच्या माहितीसाठी जाणुन घ्या सध्या भारतीय संघाचे अनेक स्टार खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. मात्र आता भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आली आहे.
या बातमीनुसार भारतीय संघाच्या स्टार खेळाडू के एल राहुल पुन्हा एकदा संघात दिसणार आहे. त्याच्या पुनरागमनाबद्दल बोलताना एका सूत्राने सांगितले की, “केएल राहुल पूर्ण तंदुरुस्तीच्या मार्गावर आहे आणि आगामी सामन्यांमध्ये तो भारतीय संघाचा भाग होऊ शकतो. तो नेटमध्ये फलंदाजीसोबत यष्टिरक्षणाचा सरावही करत आहे. तंदुरुस्त झाल्यानंतर तो लवकरच संघात परतणार आहे.
तुमच्या माहितीसाठी जाणुन विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघाचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:00 वाजता ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे. तर विश्वचषक 2023 ची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने होणार आहे आणि अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे.
राहुलच्या पुनरागमनामुळे भारतीय संघ पुन्हा एकदा बलाढ्य संघ बनणार आहे. वास्तविक, टॉप ऑर्डरमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल आणि इशान किशन या खेळाडूंचा समावेश आहे. पण मधल्या फळीत कोणताही खेळाडू भरवशाचा नव्हता. त्यामुळे राहुलच्या पुनरागमनाने मधली फळी मजबूत होईल.