मुंबई – पीएम किसान सन्मान निधीच्या (PM Kisan Samman Nidhi) लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता या योजनेत शेतकऱ्यांना (Farmers) आणखी एक मोठी सुविधा मिळणार आहे. आता शेतकऱ्यांना हप्त्याचे पैसे घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज भासणार नाही. यासाठी टपाल विभागाने नवा आराखडा तयार केला आहे. याअंतर्गत पोस्टमन शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना किसान सन्मान निधीचे पैसे देणार आहेत. यासाठी 13 जूनपर्यंत टपाल विभाग विशेष मोहीम राबवत आहे.
पोस्टल विभागाचा पुढाकार
या मोहिमेंतर्गत पोस्टमन शेतकऱ्यांच्या घरी जातील आणि हातात धरलेल्या मशिनवर अंगठा लावून पीएम सन्मान निधीची रक्कम शेतकऱ्यांना सुपूर्द करतील. प्रत्यक्षात केंद्र सरकारने टपाल खात्याला ही रक्कम शेतकऱ्यांच्या घरोघरी पोहोचवण्याची जबाबदारी दिली आहे. यासाठी सरकारने भारतीय टपाल विभागाला विशेष अधिकारही दिले आहेत. आतापर्यंत बँकेशिवाय शेतकरी स्वत: पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पैसे काढत असत.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही
टपाल खात्याने यासंदर्भात पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्यांना आदेश जारी केले आहेत. याअंतर्गत 13 जूनपर्यंत सर्व पोस्ट ऑफिस क्षेत्रातील पोस्टमनना ही रक्कम दिली जाईल, त्यानंतर पोस्टमन ती रक्कम शेतकऱ्यांच्या घरी पोहोचवतील. यासाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जाणार नाही. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी केंद्र सरकार हे मोठे पाऊल उचलत आहे.
विशेष म्हणजे 31 मे रोजी पंतप्रधान मोदींनी पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता जारी केला आहे. या योजनेची रक्कम आता शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार आहे.