iPhone 12: जर तुम्ही नवीन iPhone खरेदी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी बाजारात एक उत्तम ऑफर जाहीर करण्यात आली आहे.
आता तूम्ही या ऑफरचा फायदा घेत iPhone 12 अवघ्या 18 हजारात घरी आणू शकतात. ग्राहकांसाठी सध्या Flipkart वर Saving Days सेल सूरु आहे ज्याचा फायदा घेत तुम्ही iPhone 12 फक्त 18 हजारात घरी आणू शकतात.
iPhone 12 Flipkart ऑफर
iPhone 12 (ब्लॅक, 128GB) ची MRP रुपये 59,990 आहे आणि तुम्ही फ्लिपकार्ट डिस्काउंटनंतर 53,999 रुपयांना खरेदी करू शकता. त्याच वेळी एक्सचेंज ऑफरचा फायदा घेत तुम्ही हा फोन आणखी स्वस्तात घरी आणू शकतात.
या ऑफर अंतर्गत तुम्हाला सर्वात मोठी सूट मिळत आहे. जुना स्मार्टफोन फ्लिपकार्टवर परत केल्यावर तुम्हाला 35,000 रुपयांची वेगळी सूट मिळू शकते. म्हणजेच तुम्ही ते रु.18,399 च्या किमतीत खरेदी करू शकता. याशिवाय तुम्हाला कंपनीकडून फोनवर 1 वर्षाची वॉरंटीही मिळत आहे.
iPhone 12 स्पेसिफिकेशन्स
या फोनमध्ये तुम्हाला अप्रतिम स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. iPhone 12 मध्ये तुम्हाला 6.1 इंच सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळेल. यासोबतच फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा देखील देण्यात आला आहे, ज्याचा मेन कॅमेरा 12MP आहे. दुसरीकडे, फ्रंट कॅमेर्याच्या बाबतीत हा एक चांगला पर्याय सिद्ध होऊ शकतो कारण त्यात 12MP फ्रंट कॅमेरा आहे. याशिवाय A14 बायोनिक चिपमुळे स्पीडबाबत कोणतीही अडचण येणार नाही.