Gold Silver Rate । मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य ग्राहकांना चांगला फटका बसत आहे. लग्नसराईच्या काळात हेच दर गगनाला भिडले होते. नाइलाजाने ग्राहकांना सोने आणि चांदी जास्त पैसे देऊन खरेदी करावे लागले होते. पण आता सोने खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जाणून घेऊयात सोने आणि चांदीचे दर नेमके किती कमी झाले?
दरम्यान, मागील काही दिवसात चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. चांदीच्या दराचा विचार केला तर चांदीचे दर 93000 किलोवर गेले होते. पण मागील दोन दिवसात चांदीच्या दरात तब्बल 3000 रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सध्या चांदी 90000 रुपयांवर गेली आहे. तर सोन्याच्या दरातही दोन दिवसात 900 रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या सोन्याची किंमत ही प्रतितोळा 73600 रुपये इतकी आहे. जर तुम्ही आता सोने किंवा चांदी खरेदी करायला जाणार असाल तर तुमच्यासाठी ही खास संधी आहे. तुम्हाला पूर्वीपेक्षा कमी दरात सोने किंवा चांदी खरेदी करायला येईल.
आंतरराष्ट्रीय बाजारात कमी झाले दर
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात, COMEX वर सोने 1.22 टक्क्यांनी घसरले असून चांदीच्या दरात 1.57 टक्क्यांची घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सतत सोन्या चांदीच्या दरात वाढ होत होती. त्यामुळं सोनं खरेदीकडं लोकांनी पाठ फिरवली होती. आता पण दरात घसरण झाली असल्याने नागरिकांना सोनं चांदी खरेदी करण्याची उत्तम संधी आहे.