Gold Silver Price Today : सोने खरेदी करताय? मग, आधी चेक करा भाव; पहा, आज भाव घटले की वाढले?

Gold Silver Price Today : सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. या आठवड्यात सोन्याच्या (Gold Silver Price Today) भावात मोठी वाढ दिसून आली. आज गुरुवारी राजधानी दिल्ली शहरात सोन्यच्या (Gold Rate) भावात 500 रुपयांची वाढ झाली. या वाढीसह सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी 65 हजार 650 रुपये इतका झाला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार, जागतिक बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर दिसून येत आहे. चांदीच्या दरातही (Silver Price) तेजी दिसत आहे. आज चांदीच्या दरात 400 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. या नव्या भाववाढीसह एक किलो चांदीची किंमत 74 हजार 900 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याच्या भावात 218 रुपयांची वाढ झाली. जागतिक पातळीवर न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे वायदे भावात 0.17 टक्के वाढ झाली. यामुळे भाव 2161.90 डॉलर प्रति औंस झाले. गुडरिटर्न्स वेबसाइटनुसार, नवी दिल्लीत 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 65 हजार 170 रुपये झाली आहे. मुंबईत सोने 65 हजार 560 रुपये, कोलकाता शहरात 65 हजार 560 रुपये, चेन्नईमध्ये 66 हजार 440 रुपये, हैदराबादमध्ये 65 हजार 560 रुपये, चंदीगड 65 हजार 170, जयपूर 65 हजार 710 रुपये, पाटना 65 हजार 610 रुपये, लखनौ 65 हजार 710 रुपये, नागपूर 65 हजार 560 रुपये, सूरत 65 हजार 610 रुपये, पुणे 65 हजार 560 आणि बंगळुरू शहरात 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे भाव 65 हजार 560 रुपये असे आहेत.

Gold Silver Price Today

सोने आणि चांदी पैसे गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय मानले जातात. सण उत्सवाच्या प्रसंगी सोने खरेदी करणे भारतात शुभ मानले जाते. या काळात भारतीयांचा कल सोने खरेदीकडे असतो. जागतिक पातळीवर जेव्हा युद्धासारखी परिस्थिती निर्माण होते तेव्हा गुंतवणूकदार सोन्यात पैसे गुंतवणुकीला प्राधान्य देतात. या आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तेजीचा प्रभाव कायम राहिल्याने सोन्याच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

तुम्ही जर आता सोने खरेदी करायचे ठरवले असेल तर काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.

Gold Silver Price Today

. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डच्या सहा अंकी हॉलमार्क असलेलेच सोने शक्यतो खरेदी करा.

. सोन्याचे वजन आणि खरेदीच्या दिवशीचा भाव पाहूनच सोने खरेदी करा. कारण, सोन्याचा भाव सारखा बदलत असतो. 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे दरही वेगवेगळे असतात.

. सोन्याची खरेदी करताना शक्यता रोख स्वरुपात पैसे देणे टाळा. ऑनलाइन पद्धतीने पैसे दिल्यास संबंधित विक्रेत्याच्या बँक खात्यात पैसे जमा होतात. खरेदीची पावती घ्यायला विसरू नका.

. तुम्ही फक्त गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करत असाल तर खरेदी केलेल्या सोन्याच्या फेरविक्री मुल्याची माहिती करून घ्या. संबंधित ज्वेलरचे फेरविक्रीचे धोरण काय आहे, याचीही माहिती करून घ्या. Gold Silver Price Today

Leave a Comment