Gold Silver Price Today : सोने-चांदीच्या भावात घसरण; खरेदी करण्याआधी भाव चेक करा पटकन

Gold Silver Price Today : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वेगाने वाढ होत आहे. आज मात्र या दरवाढीला ब्रेक लागला. राजधानी नवी दिल्लीत आज सोन्याच्या भावात 400 रुपयांची घसरण झाली. काल सोन्याचे दर 66 हजार 350 रुपये प्रति तोळा असे होते. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार विदेशी बाजारात मंदी असल्याने सोन्याच्या भाव कमी झाले आहेत. चांदीच्या भावातही कपात झाली. चांदीचे दर 600 रुपयांनी कमी होऊन 75 हजार 300 रुपयांवर स्थिरावले.

आज वायदे बाजारात सोने आणि चांदीच्या दरात काहीशी वाढ दिसून आली. त्यामुळे आता जर तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर आधी भाव काय आहेत याची माहिती घ्या. तसं पाहिलं तर देशातील राज्यांत सोने चांदीचे दर वेगळे असू शकतात. याचे कारण म्हणजे राज्य सरकारांकडून आकारण्यात येणारे कर. यांमुळे राज्याराज्यांत सोन्याच्या किंमती एकसारख्या नसतात.

Gold Silver Price Today : सोने खरेदी करताय? मग, आधी चेक करा भाव; पहा, आज भाव घटले की वाढले?

Gold Silver Price Today

गुडरिटर्न्स या वेबसाइटवर सोन्याचे नवीनतम दर दिले आहेत. दिल्लीत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 990 रुपये झाली आहे. मुंबईत 65 हजार 840 रुपये, कोलकाता 65 हजार 840 रुपये, चेन्नई 66 हजार 650 रुपये, हैदराबाद 65 हजार 840 रुपये, चंदीगड 65 हजार 990 रुपये, जयपूर 65 हजार 990 रुपये, पाटणा 65 हजार 890 रुपये, लखनऊ 65 हजार 990 रुपये, नागपूर 65 हजार 840 रुपये, सूरत 65 हजार 890 रुपये, पुणे 65 हजार 840 रुपये, केरळ 65 हजार 840 रुपये आणि बंगळुरू शहरात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 65 हजार 840 रुपये इतकी झाली आहे.

सोने खरेदी करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच 

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डच्या सहा अंकी हॉलमार्क असलेलेच सोने शक्यतो खरेदी करा, सोन्याचे वजन आणि खरेदीच्या दिवशीचा भाव पाहूनच सोने खरेदी करा. कारण, सोन्याचा भाव सारखा बदलत असतो. 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे दरही वेगवेगळे असतात. सोन्याची खरेदी करताना शक्यता रोख स्वरुपात पैसे देणे टाळा. ऑनलाइन पद्धतीने पैसे दिल्यास संबंधित विक्रेत्याच्या बँक खात्यात पैसे जमा होतात. खरेदीची पावती घ्यायला विसरू नका. तुम्ही फक्त गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करत असाल तर खरेदी केलेल्या सोन्याच्या फेरविक्री मुल्याची माहिती करून घ्या. संबंधित ज्वेलरचे फेरविक्रीचे धोरण काय आहे, याचीही माहिती करून घ्या.

Gold Price Today : सोने-चांदी खरेदी करताय? जाणून घ्या, आजचा भाव काय?

Leave a Comment