नवी दिल्ली : आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत जोरदार वाढ झाली आज बुधवार 9 नोव्हेंबर रोजी भारतीय बाजारात सोन्या-चांदीला साथ मिळाली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याने आज 2 टक्क्यांहून अधिक झेप घेतली असून चांदीचा भाव सुमारे 3 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. परंतु, मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याचा भाव 0.32 टक्क्यांनी खाली आला आहे. त्याच वेळी, चांदीचा दर देखील आज 0.28 टक्क्यांनी तुटला आहे. हे सकाळच्या टप्प्यातील दर आहेत. दिवसभरात दर आणखी कमी जास्त होऊ शकतात.
बुधवारी, वायदे बाजारात सकाळी 9:10 वाजता 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 165 रुपयांनी घसरून 51,465 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. सोन्याचा भाव आज 51,450 रुपयांवर उघडला गेला. एकदा उघडल्यानंतर तो 51,537 रुपयांवर गेला. पण, काही काळानंतर सोने घसरले आणि 51,465 रुपयांवर व्यवहार सुरू झाले. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये आज चांदीच्या दरात घसरण झाली आहे. चांदीचा दर आज 176 रुपयांनी घसरून 61783 रुपयांवर आहे. चांदीचा भाव 61,766 रुपयांवर उघडला होता. एकदा किंमत 61,656 रुपयांवर गेली. पण, नंतर चांदीचा दर थोडा सुधारला आणि तो 61,783 रुपयांवर व्यवहार करू लागला.
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. सोन्याची स्पॉट किंमत 2.15 टक्क्यांनी वाढून आज 1,710.14 डॉलर प्रति औंस झाली आहे. अलीकडच्या काळातील सोन्याची ही सर्वात मोठी वाढ आहे. त्याचबरोबर आज आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीची स्पॉट किंमत 2.84 टक्क्यांनी वाढून 21.36 डॉलर प्रति औंस झाली आहे.
गेल्या आठवड्यात भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली होती. गेल्या आठवडाभरात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 42 रुपयांनी तर चांदीचा भाव 1,405 रुपयांनी वाढला होता. IBJA च्या वेबसाइटनुसार, गेल्या ट्रेडिंग आठवड्याच्या सुरुवातीला (31 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर) म्हणजेच 31 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 50,480 होता, जो प्रति 10 रुपये 50,522 पर्यंत वाढला. त्याच वेळी, 999 शुद्धतेच्या चांदीचा भाव 57,350 रुपयांवरून 58,755 रुपये प्रति किलोपर्यंत वाढला.
- वाचा : Gold Silver Price Today : आज सोने-चांदी चमकले..! पहा, सोने खरेदीसाठी किती द्यावे लागतील पैसे ?
- Gold Silver Price Today : सोने खरेदीची संधी..! आज सोन्या-चांदीचे मीटर डाऊन; भाव चेक करा पटकन