Gold Silver Price Today : नवी दिल्ली : कमकुवत जागतिक संकेतांमुळे आज भारतीय वायदे बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण (Gold Silver Price Today) झाली. भारतीय वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर (Silver Rate Today) 1 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. भारतीय बाजारात आज गुरुवार, 3 नोव्हेंबर रोजी सोन्याचा भाव (Gold Rate Today) कमजोरीने उघडला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोन्याचा दर गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात 0.57 टक्क्यांनी घसरला आहे. त्याचवेळी आज चांदीचा दर 1.22 टक्क्यांनी घसरला आहे.
गुरुवारी वायदे बाजारात सकाळी 9:05 वाजता 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 286 रुपयांनी घसरून 50,320 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. सोन्याचा दर आज 50,500 रुपये प्रति दहा ग्रॅमवर उघडला गेला. एकदा उघडल्यानंतर तो 50,280 रुपयांपर्यंत गेला. पण काही काळानंतर तो सावरला आणि 50,320 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. काल सोन्याच्या फ्युचर्स किमती 0.26 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाल्या होत्या. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चांदीचा दर आज 716 रुपयांनी घसरून 58,074 रुपयांवर आला आहे. चांदीचा भाव 58,441 रुपयांवर उघडला होता. एकदा किंमत 57,853 रुपयांवर गेली. पण नंतर किमतीत थोडी सुधारणा झाली आणि दर 58,074 रुपये झाला.
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरांवर दबाव आहे. सोन्याचा स्पॉट भाव आज 0.62 टक्क्यांनी घसरून $1,636.68 प्रति औंस झाला. त्याचवेळी, आज आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या किमतीतही घसरण झाली असून आज चांदीची किंमत 1.61 टक्क्यांनी घसरून 19.32 डॉलर प्रति औंस झाली आहे.
बुधवारी नवी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 51 रुपयांनी वाढला होता. त्याचबरोबर चांदीचा भाव किलोमागे 502 रुपयांनी तुटला. सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 51 रुपयांनी वाढून 50,964 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोने 50,913 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. 2 नोव्हेंबर रोजी चांदी 502 रुपयांनी घसरून 59,265 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.
- IMP News : Business Deal : शिबाशिष सरकारने १४० दशलख डॉलर देऊन खरेदी केल्या “या” दोन कंपन्या
- Business News : आयएमएफने का दिला परकीय चलन साठा वाचवण्याचा सल्ला : वाचा सविस्तर
- Gold Price : ‘त्या’ कारणामुळे सोन्याचे भाव होताहेत कमी जास्त; सोने खरेदीआधी जाणून घ्या, महत्वाची माहिती..