Gold Silver Price : जर तुम्ही दिवाळीच्या (Diwali Festival) हंगामात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी चांगली ठरू शकते. सोन्याचा भाव (Gold Price) शुक्रवारी घसरला असून तो 50,000 च्या खाली गेला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price) घट झाल्याने खरेदीदारांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजनुसार, शुक्रवारी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 0.48 टक्क्यांनी घसरून 49 हजार 903 वर आली आहे. यासोबतच चांदीच्या दरातही (Silver Price) मोठी घसरण झाली असून आज एक किलो चांदीचा भाव 0.84 टक्क्यांनी घसरून 56 हजार 175 रुपये झाला आहे. येत्या काळात सोन्या-चांदीच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. डॉलरचे मूल्य वाढल्याने सोन्याचे भाव आणखी खाली येऊ शकतात, असे मानले जात आहे. सध्या, डॉलरची ताकद दर्शविणारा डॉलर निर्देशांक सुमारे 22 वर्षांत 113 च्या सर्वाधिक पातळीच्या आसपास आहे.
IBJA ने प्रसिद्ध केलेल्या दरांनुसार, गुरुवारी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 50 हजार 230 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. यावर्षी 10 ग्रॅम सोन्याचा भाव सर्वाधिक पातळीपासून सुमारे 4,000 रुपयांनी खाली आला आहे. दिल्लीत 24 कॅरेट शुद्ध 10 ग्रॅम सोन्याची किंमत (Gold Rate In Delhi) 50 हजार 600 रुपये आहे. कोलकातामध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 50,450 रुपयांना विकले जात आहे. मुंबईत (Gold Rate In Mumbai) 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 50,450 रुपयांना उपलब्ध आहे. लखनौमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 50,600 रुपयांना विकले जात आहे. हैदराबादमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 50,450 रुपयांना उपलब्ध आहे. तर पाटण्यात 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 50 हजार 480 रुपये आहे.
- हे सुद्धा वाचा : Business Stock News : म्हणून झाली श्री सिमेंटच्या शेअरमध्ये ४ टक्क्यांनी घसरण
- Gold Price : दिवाळीच्या तोंडावर सोने-चांदीचे मीटर तेजीत; पहा, आज किती रुपये वाढले भाव ?
- Small Business Idea For Diwali : दिवाळीत सुरू करा ‘हे’ छोटे व्यवसाय, भरभराट होईल हमखास..