Gold Price Update: देशातील सराफा बाजारात मागच्या काही दिवसांपासुन सोन्या-चांदीचे दर चढता-उतरताना दिसत आहेत. यातच तूम्ही देखील सोन खरेदी करणार असाल तर जाणून घ्या की आज बाजारात सोनं त्याच्या उच्च पातळीच्या दरापेक्षा 600 रुपयांनी कमी दराने विकले जात आहे.
मंगळवारी सकाळी बाजारात 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा भाव 61,170 रुपये नोंदवला गेला, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 56,030 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
सोन्याचे दर जाणून घ्या
जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अनेक शहरांमध्ये दराची माहिती मिळू शकते. तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा दर 52,285 रुपये नोंदवला गेला, तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) 47,927 रुपये होता. देशाची राजधानी दिल्लीत 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा भाव 61,900 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा भाव 56,750 रुपये होता.
पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा दर 61,750 रुपये होता, तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा दर 56,600 रुपये नोंदवला गेला. यासह आर्थिक राजधानी मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) भाव 61,750 रुपयांवर पोहोचला आहे. यासोबतच 22 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) भाव 56,600 रुपये होता.
ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये 24 कॅरेट सोन्याचा (10ग्रॅम) दर 61,750 रुपये नोंदवला गेला, तर 22 कॅरेट सोन्याचा (10ग्रॅम) दर आज 56,600 रुपयांवर पोहोचला. गेल्या 24 तासांत 10 ग्रॅम (24 कॅरेट/22 कॅरेट) सोन्याच्या 24 कॅरेट/22 कॅरेटच्या किमतीत 120 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली.