Gold Price Today : जर तुम्ही लग्नासाठी किंवा इतर शुभ कार्यासाठी सोने खरेदी करणार असाल तर कृपया उशीर करू नका याचा मुख्य कारण म्हणजे आज सराफा बाजारात सोने त्याचा उच्च पातळीच्या दरापेक्षा खूपच स्वस्त विकले जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, काही कारणास्तव तुम्ही ताबडतोब सोने खरेदी केले नाही, तर येत्या काही दिवसांत तुम्हाला त्याची किंमत वाढू शकते. व्यापार सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी भारतीय बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत 56,680 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 51,910 रुपये प्रति दहा ग्रॅम नोंदवली गेली.
या महानगरांमधील सोन्याचा दर पटकन जाणून घ्या
देशातील अनेक शहरांमध्ये सध्या सोन्याच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर 57,530 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा दर 52,750 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका नोंदवला गेला. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 57,380 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 52,600 रुपये नोंदवला गेला.
ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 1,150 रुपयांनी घसरला. यासह 24 कॅरेट सोन्याचा दर 57,380 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 52,600 रुपये प्रति दहा ग्रॅम नोंदवला गेला.
याशिवाय महाराष्ट्राची राजधानी मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर 57,380 रुपये होता, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 52,600 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 52,285 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 47,927 रुपये प्रति दहा ग्रॅम नोंदवला गेला.
असे जाणून घ्या सोन्याचे नवीनतम दर
सोने खरेदी करण्याच्या पूर्वी आम्ही तुम्हाला एक मार्ग सांगणार आहोत जिथून तुम्हाला किंमतीची माहिती मिळेल.
बाजारामध्ये 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 वर मिस कॉल द्यावा लागेल. यानंतर तुम्हाला एसएमएसद्वारे किंमतीची माहिती मिळेल.