Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत आज मोठी वाढ पाहण्यास (Gold Price Today) मिळाली. आज मंगळवारी सोन्याचे भाव तब्बल 1 हजार रुपयांनी वाढले. या भाववाढीमुळे सोन्याचा भाव (Gold Rate) आता 65 हजार रुपये प्रति तोळा असा झाला आहे. चांदीचा भाव 74 हजार 400 रुपये प्रति किलो (Silver Price) असा झाला आहे. राजधानी दिल्लीत 22 कॅरेट सोन्यासाठी 58 हजार 600 रुपये तर 24 कॅरेटसाठी 65 हजार रुपये द्यावे लागतील. मुंबईत 22 कॅरेट सोने 58 हजार 740 रुपये तर 24 कॅरेटसाठी 64 हजार 850 रुपये द्यावे लागतील. चेन्नईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 64 हजार 900 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
तसं पाहिलं तर मागील दोन आठवड्यांपासून सोन्याच्या दरात तेजी होती. वाढीव व्याजदर आणि इक्विटी मार्केटमध्ये चांगली कामगिरी झाल्यानंतरही सोन्याच्या दरात वाढ दिसून येत आहे. जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि भू राजकीय तणाव यांसह आणखी काही कारणांमुळे सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या दिवसांत जर तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील.
Gold Price Update: बाजारात सोने खरेदीसाठी गर्दी! मिळत आहे 36 हजारांपेक्षा स्वस्त; जाणुन घ्या नवीन दर
Gold Price Today
देशातील मोठ्या शहरांचा विचार केला तर या शहरात 24 कॅरेट सोन्याचे दर असे आहेत – चेन्नई 65 हजार 620, कोलकाता 64 हजार 850, गुरुग्राम 65 हजार, लखनौ 65 हजार, बंगळुरू 64 हजार 850, जयपूर 65 हजार, पाटणा 64 हजार 900, भुवनेश्वर 64 हजार 850 आणि हैदराबाद शहरात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 64 हजार 850 रुपये असा आहे.
तुम्ही जर आता सोने खरेदी करायचे ठरवले असेल तर काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.
Gold Price Today
. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डच्या सहा अंकी हॉलमार्क असलेलेच सोने शक्यतो खरेदी करा.
. सोन्याचे वजन आणि खरेदीच्या दिवशीचा भाव पाहूनच सोने खरेदी करा. कारण, सोन्याचा भाव सारखा बदलत असतो. 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे दरही वेगवेगळे असतात.
. सोन्याची खरेदी करताना शक्यता रोख स्वरुपात पैसे देणे टाळा. ऑनलाइन पद्धतीने पैसे दिल्यास संबंधित विक्रेत्याच्या बँक खात्यात पैसे जमा होतात. खरेदीची पावती घ्यायला विसरू नका.
. तुम्ही फक्त गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करत असाल तर खरेदी केलेल्या सोन्याच्या फेरविक्री मुल्याची माहिती करून घ्या. संबंधित ज्वेलरचे फेरविक्रीचे धोरण काय आहे, याचीही माहिती करून घ्या.