Gold Price Today : आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठी (Gold Price Today) वाढ झाली आहे. आता देशात सणासुदीचे दिवस सुरू आहेत. नवरात्रोत्सव जवळ येऊन ठेपला आहे. त्यानंतर दसरा-दिवाळीचाही सण आहे. या काळात सोन्याला मागणी वाढत असते. मात्र, आतापासूनच सोने-चांदीच्या दरात चढ उतार होताना दिसत आहे. आज बुधवारी दोन्ही धातूंच्या किंमतीत वाढ दिसून आली. जर या काळात तुम्ही सोने खरेदी करणार असताल किंवा तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर आधी सोन्याचे काय भाव आहेत याची माहिती तुम्हाला असली पाहिजे. आज सोने 100 रुपयांनी तर चांदी 400 रुपयांनी महागली आहे.
एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार, आज देशाची राजधानी दिल्ली शहरात सोन्याचा भाव 100 रुपयांनी वाढून 58,700 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. गेल्या व्यवहारात सोन्याचा भाव 58,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचा भाव 1,867 डॉलर प्रति औंसवर होता. सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. आज सराफा बाजारात चांदीच्य दरात प्रति किलो 400 रुपयांची वाढ दिसून आली. त्यामुळे चांदीचे भाव 73 हजार रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत.
गुडरिटर्न्स या वेबसाइटनुसार असे आहेत सोन्याचे भाव
दिल्ली शहरात 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,680 रुपये आहे.
नोएडामध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,680 रुपये आहे.
मुंबईत 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,530 रुपये आहे.
चेन्नईमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,600 रुपये आहे.
कोलकात्यात 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,530 रुपये आहे.
बेंगळुरूमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,530 रुपये आहे.
केरळमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,530 रुपये आहे.
पाटण्यात 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,580 रुपये आहे.
सूरतमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,580 रुपये आहे.
चंदीगडमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,680 रुपये आहे.
लखनौमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,680 रुपये आहे.