Gold Price Today : आज सोमवार आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात (Gold Price Today) चढ-उतार पाहायला मिळत आहेत. 24 कॅरेटच्या 10 ग्रॅमचा भाव 150 रुपयांनी वाढून 60,050 रुपयांवर पोहोचला आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 55,050 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीच्या दरात (Silver Price) 200 रुपयांनी घट झाली असून, त्याची किंमत 74,500 रुपये किलो झाली आहे.
दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,210 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 55,200 रुपये इतका आहे. मुंबई: 24 कॅरेट 60,050 रुपये; 22 कॅरेट रु 55,050, कोलकाता: 24 कॅरेट रु 60,080; 22 कॅरेट रु 55,050 आणि चेन्नई शहरात 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,440 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 55,400 रुपये इतका आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याचा भाव 0.18 टक्क्यांनी वाढून $1,949.70 प्रति औंस आणि चांदीचा भाव 0.15 टक्क्यांनी वाढून $23.42 प्रति औंस झाला. बुधवारी अमेरिकेच्या केंद्रीय बँकेची बैठक होणार आहे. यामध्ये व्याजदरांबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, त्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या किमतीवर होणार आहे.
वायदे बाजारात सोन्याचा भाव 182 रुपयांनी वाढला आहे. यामुळे मल्टि कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या फ्युचर्सचा ऑक्टोबरचा करार 59,175 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने व्यवहार करत आहे. आज सोन्यात 9,593 लॉटची खरेदी झाली. त्याच वेळी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये चांदीची किंमत 317 रुपयांनी वाढून 72,471 रुपये प्रति किलो झाली आहे. चांदीचा व्यवहार 16,746 लॉटमध्ये झाला. सकारात्मक वातावरणामुळे चांदीच्या दरात वाढ झाल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.