Gold Price Today : आज सोमवार. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने चांदीच्या (Gold Price Today) नवीन किंमती जाहीर झाल्या आहेत. राजधानी दिल्लीत 10 ग्रॅमने सोन्याची किंमत (Gold Rate) 66 हजार 420 रुपये इतकी झाली आहे. या प्रमाणेच देशातील अन्य मोठ्या शहरांतील सोन्या चांदीचे (Gold Silver Price Today) दर अपडेट झाले आहेत. त्यामुळे सध्या तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर आधी सोन्याचे भाव तपासा.
गुडरिटर्न्स या वेबसाइटवर सोन्याचे नवीनतम दर दिले आहेत. दिल्लीत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 66 हजार 420 रुपये झाली आहे. मुंबईत 66 हजार 270 रुपये, कोलकाता 66 हजार 270 रुपये, चेन्नई 67 हजार 100 रुपये, हैदराबाद 66 हजार 270 रुपये, चंदीगड 66 हजार 420 रुपये, जयपूर 66 हजार 420 रुपये, पाटणा 66 हजार 320 रुपये, लखनऊ 66 हजार 420 रुपये, नागपूर 66 हजार 270 रुपये, सूरत 66 हजार 320 रुपये, पुणे 66 हजार 270 रुपये, केरळ 66 हजार 270 रुपये आणि बंगळुरू शहरात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 66 हजार 270 रुपये इतकी झाली आहे.
Gold Silver Price Today : सोने खरेदी करताय? मग, आधी चेक करा भाव; पहा, आज भाव घटले की वाढले?
Gold Price Today
वायदे व्यवहारात आज सोन्याच्या किंमतीत 73 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये एप्रिल डिलीव्हर सोन्याची किंमत 73 रुपयांनी वाढून 66 हजार 96 रुपये प्रति 10 ग्रॅम अशी झाली. वायदे व्यवहारात चांदीची किंमत 38 रुपयांनी वाढून 74 हजार 300 रुपये प्रति किलो अशी झाली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये मे डिलीव्हरीसाठी चांदीच्या किंमतीत 38 रुपयांतची वाढ झाली.
तुम्ही जर आता सोने खरेदी करायचे ठरवले असेल तर काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.
Gold Price Today
. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डच्या सहा अंकी हॉलमार्क असलेलेच सोने शक्यतो खरेदी करा.
. सोन्याचे वजन आणि खरेदीच्या दिवशीचा भाव पाहूनच सोने खरेदी करा. कारण, सोन्याचा भाव सारखा बदलत असतो. 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे दरही वेगवेगळे असतात.
. सोन्याची खरेदी करताना शक्यता रोख स्वरुपात पैसे देणे टाळा. ऑनलाइन पद्धतीने पैसे दिल्यास संबंधित विक्रेत्याच्या बँक खात्यात पैसे जमा होतात. खरेदीची पावती घ्यायला विसरू नका.
. तुम्ही फक्त गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करत असाल तर खरेदी केलेल्या सोन्याच्या फेरविक्री मुल्याची माहिती करून घ्या. संबंधित ज्वेलरचे फेरविक्रीचे धोरण काय आहे, याचीही माहिती करून घ्या.