Gold Price Today: ग्राहकांनो, होळीपूर्वी खरेदी करा सोने, मिळत आहे खूपच स्वस्त; नवीन दर तपासा

Gold Price Today: भारतीय सराफा बाजारामध्ये गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घट झाली आहे. यामुळे बाजारात सोन्याच्या आधी खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

हे जाणून घ्या कि, बाजारात आज 18 मार्च 2024 रोजी सोने आणि चांदी स्वस्त झाले आहेत. आज भारतीय सराफा बाजारात सोन्याचा भाव 65 हजार प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेला आहे तर प्रतिकिलो चांदीचा भाव 73 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.

आज भारतीय सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅम किंमत 65, 270 रुपये आहे तर एक किलो चांदीची किंमत 73,772 रुपये आहे. यातच जर तुम्ही होळीपूर्वी सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी स्वस्तात सोने खरेदीची ही एक सुवर्णसंधी आहे.

महायुतीत ‘या’ 6 जागांवरून पुन्हा वाद? अनेक चर्चांना उधाण

आज सोन्या-चांदीचा भाव किती आहे?

ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, आज म्हणजेच सोमवारी सकाळी 995 शुद्धतेच्या सोन्याची किंमत 65009 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. त्याच वेळी, आज 916 (22 कॅरेट) शुद्धता असलेल्या सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 59,787 रुपये आहे. तर 750 शुद्धता (18 कॅरेट) सोन्याचा भाव 48, 953 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. तर 585 शुद्धता (14 कॅरेट) सोन्याचा भाव 38,183 वर ट्रेंड करत आहे.

चांदीची किंमत किती आहे?

999 शुद्धतेच्या एक किलो चांदीची किंमत आज म्हणजेच 18 मार्च 2024 रोजी 73,772 रुपये झाली आहे. सोन्या-चांदीच्या दरात दररोज बदल होताना दिसत आहेत.

Hero HF Deluxe आता घरी आणता येणार फक्त 13 हजारात! असा घ्या फायदा

Leave a Comment