Gold Price Today : या महिन्याच्या शेवटी साजरा केला जाणारा रक्षाबंधनाच्या सणामुळे बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. यामुळे सध्या बाजारात सोने देखील स्वतात विकले जात आहे.
यातच जर तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता स्वस्तात सोने खरेदी करू शकतात. आज बाजारात पुन्हा एकदा सोने स्वस्त झाले आहे.
मात्र हे जाणुन घ्या येत्या काही दिवसांत सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. आज भारतीय सराफा बाजारात सोन्याचा भाव 58 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे.
सर्व कॅरेट सोन्याचे दर पटकन जाणून घ्या
सोने त्याच्या उच्च पातळीच्या दरापेक्षा खूपच कमी दराने विकले जात आहे. IBJA नुसार 24 कॅरेट सोन्याचा भाव 58435 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. यासोबतच 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 53742 रुपये इतका आहे.
याशिवाय 18 कॅरेट सोन्याचा दर बाजारात 44003 रुपये नोंदवला गेला. तुम्ही एक तोळा 14 कॅरेट सोने 34,322 रुपयांना सहज खरेदी करू शकता. तसेच 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचा दर आज 73397 रुपये इतका नोंदवला गेला.
मिस्ड कॉलद्वारे सोन्याचे दर जाणून घ्या
सोने खरेदी करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या शहराचे नवीनतम दर सहज जाणून घेऊ शकता. यासाठी शनिवार आणि रविवार वगळता इतर सर्व दिवशी सोन्याचे दर IBJA द्वारे जारी केले जातात.
तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर आरामात मिस्ड कॉल द्यावा लागेल. येथे तुम्ही एसएमएसद्वारे दराची माहिती मिळवू शकता.