Gold Price Today : भारतीय सराफा बाजारात सध्या सोने खरेदीची सुवर्णसंधी आहे. बाजारात मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. यामुळे बाजारात सोने खरेदीसाठी गर्दी देखील होत आहे.
आज बाजारात सोने त्याच्या उच्च पातळीच्या दरापेक्षा खूपच स्वस्त विकले जात आहे. आज सोने त्याच्या उच्च पातळीच्या दरापेक्षा 2,300 रुपयांनी स्वस्त विकले जात आहे.
आज ट्रेडिंग आठवड्याच्या पहिल्या दिवशी 24 कॅरेट आणि 22 कॅरेटच्या दरात 400 रुपयांची घट दिसून आली आहे. बाजारात आज 24 कॅरेट सोन्याचा भाव सकाळी 59,460 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,460 रुपये प्रति तोळा नोंदवला गेला.
जाणून घ्या देशातील या शहरांमधील सोन्याचे नवीनतम दर
जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये सोन्याची अत्यंत स्वस्तात विक्री होत आहे. येथे 24 कॅरेट सोने 52,285 रुपयांवर ट्रेंड करत आहे, तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) 47,927 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ट्रेंड करत आहे. देशाची राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर 60,320 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा दर 55,300 रुपये प्रति तोला होता.
पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 60,160 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 55,150 रुपये प्रति दहा ग्रॅम नोंदवली गेली आहे. राष्ट्रीय आर्थिक राजधानी मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर 60,160 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 55,150 रुपये प्रति तोळा नोंदवला गेला. ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये आज 24 कॅरेट सोने 60,160 रुपये, तर 22 कॅरेट सोने 55,150 रुपये प्रति तोळा विकले जात आहे.
असे जाणून घ्या सोन्याचे नवीनतम दर
जर तुम्ही देशातील सराफा बाजारात सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आधी दराची माहिती घ्या. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. तुमच्या फोनवर मेसेज पाठवला जाईल. याच्या मदतीने तुम्हाला नवीनतम दरांची माहिती मिळू शकते.