Gold Price Today: सोन्याचे भाव घसरले, 10 ग्रॅम खरेदीसाठी खर्च होणार फक्त ‘इतके’ पैसे

Gold Price Today: देशात आता लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे त्यामुळे बाजारात सोने खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दारात झालेली वाढ पाहता यावेळी गर्दी कमी झाली आहे.

 यातच जर तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

सध्या भारतीय बाजारात सोने त्याच्या उच्च दरापेक्षा खूपच स्वस्त विकले जात आहे, यामुळे तुम्ही सोने खरेदी करून पैशांची बचत देखील करू शकतात.

आज भारतीय सराफ बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर 71,780 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा दर 65,750 रुपये प्रति दहा ग्रॅम नोंदवला गेला.

ओडिशाच्या बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,820 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​ट्रेंड करत होता. 22 कॅरेट सोन्याचा भाव 58,500 रुपये प्रति तोळा होता. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,200 रुपये प्रति तोळा नोंदवला गेला.

येथे 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,200 रुपये प्रति दहा ग्रॅम असा ट्रेंड होताना दिसत आहे.

राष्ट्रीय आर्थिक राजधानी मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,050 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,050 रुपये प्रति तोळा होता. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये 24 कॅरेट 72050 रुपये, 22 कॅरेट 66,050 रुपये प्रति तोळा दराने विकले जात होते.

कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये 24 कॅरेटची किंमत 72,050 रुपये आणि 22 कॅरेटची किंमत 66,050 रुपये प्रति दहा ग्रॅमने विकली गेली.

मिस्ड कॉलद्वारे सोन्याचे दर जाणून घ्या

येत्या काही दिवसांत कुटुंबातील एखाद्या सदस्याचे लग्न होणार असेल, तर आधी सोने खरेदी करायचे असल्यास उशीर करू नका. खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही घरबसल्या दराची माहिती देखील मिळवू शकता.

यासाठी तुम्हाला 8955664433 या नंबरवर फक्त मिस कॉल द्यावा लागेल. तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही नवीनतम दर तपासू शकता.

Leave a Comment