Gold Price : मुंबई : आज देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती (Gold Price) नफावसुलीच्या काळातून जात आहेत. यूएस फेडरल रिजर्व्हच्या (US Federal Reserve Meet) बैठकीपूर्वी सोन्याच्या दरात चढ-उतार सुरूच आहेत. गेल्या आठवड्यात, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर शुक्रवारच्या सत्रात सोन्याचे दर 507 रुपये प्रति 10 ग्रॅम किंवा 1 टक्क्यांनी घसरले आणि 50,230 रुपयांवर बंद झाले, तर स्पॉट गोल्डचे दर 1.07 टक्क्यांनी घसरून $1,644 प्रति औंस झाले.
कमोडिटी मार्केट तज्ज्ञांच्या मते, तिसर्या तिमाहीतील यूएस आर्थिक डेटा अपेक्षेपेक्षा अधिक चांगला आल्यानंतर डॉलर निर्देशांकाने उडी मारल्यानंतर यूएस फेडरल व्याजदर वाढीबाबत आपली भूमिका बदलू शकेल अशी अटकळ आहे. या अपेक्षेमुळे सोन्याच्या किमतीत घसरण झाली.
मिंटने दिलेल्या वृत्तानुसार, बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले की, स्पॉट सोन्याच्या किमतीचा सध्याचा सपोर्ट बेस $1,630 आहे, तर बळकट सपोर्ट $1,600 प्रति औंस या पातळीवर आहे, तर मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा सपोर्ट बेस जवळपास 49,700 ते 49 हजार 800 रुपये आहे. कमॉडिटी बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले की, प्रामुख्याने जागतिक संकेत आणि यूएस फेडरलच्या बैठकीचे निकाल हे आज सोन्याच्या किमतीला महत्त्वाचे कारण ठरतील. यूएस फेडरल रिजर्व्हच्या बैठकीच्या निकालांपूर्वी, सोने (Gold) मर्यादित अस्थिरतेसह चालू राहू शकतो.
आयआयएफएल सिक्युरिटीजचे अनुज गुप्ता म्हणाले, की “पुढील आठवड्यात यूएस फेडरलच्या बैठकीचा निकाल येईपर्यंत सोन्याची किंमत $1630 ते $1,685 च्या श्रेणीत राहण्याची अपेक्षा आहे. तिसर्या तिमाहीत अमेरिकेतील (America) अपेक्षेपेक्षा चांगल्या आर्थिक आकडेवारीनंतर डॉलर निर्देशांकाने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे, जे सोन्याच्या किमती घसरण्याचे मुख्य कारण आहे. बैठकीचे निकाल जाहीर होईपर्यंत मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचे दर 49,700 ते 51,200 रुपयांच्या श्रेणीत राहणे अपेक्षित आहे.
- Read : Gold Silver Price : दिवाळीत सोनं खरेदीची संधी.. सोन्या-चांदीच्या किंमती घसरल्या; चेक करा आजचे भाव
- Gold Price : दिवाळीच्या तोंडावर सोने-चांदीचे मीटर तेजीत; पहा, आज किती रुपये वाढले भाव ?
- Gold Price Today : सोन्या चांदीच्या दरात घसरण सुरुच.. सोने खरेदीआधी चेक करा काय आहे नवीन भाव