Gold Price : सध्याच्या काळात तुम्ही सोने चांदी खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. मागील 11 महिन्यांच्या काळात जागतिक बाजारात सोन्याच्या किंमती सर्वाधिक कमी झाल्या आहेत. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये शुक्रवारी सोन्याच्या किंमती (Gold Price) कमी झाल्याचे दिसून आले. शुक्रवारी फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा भाव 158 रुपयांनी घसरून 50,070 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये ऑगस्टमधील डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 158 रुपये किंवा 0.31 टक्क्यांनी घसरून 50,070 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
Discount Offers: कार खरेदीची उत्तम संधी! ‘या’ स्वस्त कार्सवर 94000 रुपयांपर्यंतच्या जबरदस्त ऑफर्स https://t.co/mxE32TDlLg
— Krushirang (@krushirang) July 12, 2022
चांदीचे दरही (Silver Price) सातत्याने कमी होत आहेत. चांदीची देशांतर्गत वायदा किंमत 55,000 रुपये प्रति किलोपेक्षा कमी आहे. शुक्रवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये चांदीची वायदा किंमत 0.57 टक्के किंवा 314 रुपयांनी कमी होऊन 54,721 रुपये प्रति किलो राहिली. सध्या जागतिक बाजारात सोने 11 महिन्यांच्या कमी पातळीवर आले आहे. जागतिक पातळीवर न्यूयॉर्कमध्ये (New York) सोन्याचा भाव 0.31 टक्क्यांनी घसरून 1,700.50 रुपये प्रति औंस झाला.
SBI: SBI ने ग्राहकांना दिली मोठी भेट; आता तुम्हाला घरी बसून मिळणार 35 लाख, जाणून घ्या कसे https://t.co/E0ZgiERGUG
— Krushirang (@krushirang) July 14, 2022
तसे पाहिले तर आपल्या देशात सोन्याला कायमच मागणी असते. सण उत्सवाच्या काळात तर ही मागणीच आणखीच वाढते. त्यासाठी नेहमीच दुसऱ्या देशांकडून सोने आयात (Gold Import) करावी लागते. त्यामुळे जागतिक बाजारातील घडामोडींचा देशांतर्गत सोने चांदीच्या दरावर परिणाम होतो. जागतिक बाजार सोने आणि चांदीचे दर कमी किंवा जास्त झाले तर त्यानुसार देशांतर्गत बाजारपेठेतील दर निश्चित होतात. मध्यंतरी कोरोना (Corona) काळात सर्वकाही ठप्प होते. त्यावेळी सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी सोन्याने तर 56 हजारांचाही टप्पा पार केला होता. कारण, या काळात लोकांनी सुरक्षित गुंतवणूक ( Investment) म्हणून सोने खरेदी केली होती. त्यामुळे या काळात सोन्याची मागणी वाढली होती. त्याचा परिणाम दरवाढीत दिसून आला. आता मात्र तशी परिस्थिती नाही. तरी देखील सोन्याचे भाव फारसे कमी झालेले नाहीत.
मोदी सरकारसाठी Good News.. पैसेही वाढले, सोनेही वाढले; पहा, नेमके घडले तरी काय..