Gold : सामान्यत: सणांमध्ये सोन्याच्या किंमती वाढतात. परंतु यावेळी देशांतर्गत बाजारात सणांमुळे नव्हे तर तुर्की (Turkey) आणि चीनमुळे (China) सोने विक्रमी पातळी गाठू शकते. खरं तर, भारताला सोन्याचा पुरवठा करणाऱ्या तीन विदेशी बँकांनी पुरवठा कमी केला आहे आणि अधिक नफा मिळवण्यासाठी त्या तुर्की आणि चीनला सोने (Gold) विकत आहेत. जगभरातील आर्थिक मंदीच्या भीतीने आधीच सोन्याचे भाव वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण पुरवठा कमी झाल्यामुळे भारतात (India) त्याची किंमत वेगाने वाढण्याची शक्यता आहे.
रॉयटर्सच्या अहवालानुसार, भारतात सोन्याचा सर्वाधिक पुरवठा जेपी मॉर्गन, स्टँडर्ड चार्टर्ड आणि आयसीबीसी स्टँडर्डकडून होतो. या बँका दरवर्षी सणासुदीच्या आधी सोन्याच्या खाणीतून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतात आणि त्यांच्याकडे ठेवतात. त्यानंतर जगभरातील देशांमध्ये सोन्याची विक्री होते. मात्र यावेळी हे सोने भारतापेक्षा चीन आणि तुर्कस्तानसारख्या देशांना जास्त पुरवले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या बँकांकडे एकूण गरजेच्या तुलनेत केवळ 10 टक्केच सोने ठेवण्यात आले आहे.
सध्या तुर्कीमध्ये महागाईने उच्चांक गाठल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हे पाहता लोक आपल्या देशाच्या चलनावर अवलंबून न राहता मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत आहेत. त्यामुळे तेथील सोन्याची मागणी अनेक पटींनी वाढली आहे. आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये तुर्कीची सोन्याची आयात (Gold Import) 543 टक्के आणि चीनची 40 टक्क्यांनी वाढली आहे. त्याच वेळी, याच कालावधीत भारताच्या सोन्याच्या आयातीत 30 टक्क्यांनी घट झाली आहे.
अहवालानुसार, तुर्कीमध्ये सोन्याची विक्री केल्यास प्रति औंस $80 चा प्रीमियम मिळत आहे, म्हणजेच बाजारभावापेक्षा जास्त नफा मिळत आहे. त्याच वेळी, चीनमध्ये $20-45 प्रति औंसचा प्रीमियम उपलब्ध आहे. भारतात गेल्या वर्षी, बँकांना आंतरराष्ट्रीय बेंचमार्कपेक्षा सुमारे $4 प्रति औंसने प्रीमियम मिळत होता, जो सध्या एक ते दोन डॉलर प्रति औंसवर आला आहे. अशा पुरवठादार बँकांना भारतापेक्षा चीन आणि तुर्कीला सोने विकणे अधिक फायदेशीर वाटत आहे.
आयआयएफएलचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी सांगितले की, मंदीच्या भीतीने जगातील चलने डॉलरच्या तुलनेत वेगाने घसरत आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत, त्यामुळे त्याचे भाव वाढत आहेत. पण तुर्कस्तानमध्ये परिस्थिती अधिक वाईट आहे, जिथे लोकांचा त्यांच्या चलनावरील विश्वास कमी होत आहे आणि ते सोने खरेदी करत आहेत. आगामी काळात किमतीत चढ-उतार झाल्यानंतरही दिवाळीपर्यंत सोन्याने 52 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमची पातळी पार केली असल्याचे गुप्ता यांचे म्हणणे आहे. दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचा भाव (Gold Price In Delhi) 980 रुपयांनी वाढून 51,718 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1,710 डॉलर प्रति औंसवर राहिले.
Gold Price : आज सोन्याचे मीटर डाऊन; खरेदी करण्याआधी चेक करा काय आहेत भाव
Gold Price : खुशखबर.. सात महिन्यांत सोन्याचे भाव ‘इतके’ कमी.. जाणून घ्या, काय आहेत भाव ?