Gold Price : गुरुवारी आंतरराष्ट्रीय बाजार आणि भारतीय वायदा बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ (Gold Price) झाली आहे. भारतीय बाजारात आज चांदीच्या दरात (Silver Price) थोडी वाढ झाली असली तरी जागतिक बाजारात त्याची किंमत घसरली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याचा भाव 0.02 टक्क्यांनी वाढला आहे. त्याच वेळी चांदीची किंमत 0.04 टक्क्यांनी वाढली आहे.
गुरुवारी सकाळी 24 कॅरेट शुद्धतेचे सोने 11 रुपयांनी वाढून 50,916 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. सोन्याचा भाव आज 50,891 रुपयांवर उघडला गेला. एकदा तो 50,918 वर गेला. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर आज चांदीच्या किमतीत वाढ दिसून येत आहे. चांदीचा दर आज 23 रुपयांनी वाढून 57,348 रुपयांवर पोहोचला आहे. आज चांदीचा व्यवहार 57,374 रुपयांपासून सुरू झाला. एकदा किंमत 57,400 रुपये झाली. पण, काही काळानंतर तो 57,348 रुपयांवर व्यवहार करू लागला. हे सकाळच्या सत्रातील दर आहेत. दिवसभरात यामध्ये आणखीही बदल होऊ शकतात.
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्याचबरोबर आज चांदीचा दर घसरला आहे. सोन्याची स्पॉट किंमत 0.32 टक्क्यांनी वाढून $1,669.0.6 प्रति औंस झाली. गेल्या अनेक व्यवहारातील घसरणीनंतर आज सोन्याचे भाव सावरले आहेत. चांदीच्या दरातही आज घसरण झाली आहे. चांदीची स्पॉट किंमत आज 0.79 टक्क्यांनी घसरली आहे आणि किंमत $ 18.98 प्रति औंस झाली आहे.
राष्ट्रीय राजधानीत काल म्हणजेच बुधवारी सोन्याचा भाव 20 रुपयांनी घसरून 51,155 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 51,175 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. सोन्याप्रमाणेच चांदीचा भावही ४७३ रुपयांच्या घसरणीसह ५८,१६९ रुपये प्रति किलोवर बंद झाला.
दरम्यान, देशभरात सध्या सण उत्सवांचे दिवस सुरू आहेत. दिवाळीचा (Diwali Festival 2022) मोठा सण अगदी जवळ आला आहे. या काळात सोन्याला मागणी वाढत असते. त्यामुळे आगामी काळात सोने आणि चांदीच्या किंमती वाढण्याची शक्यता जास्त असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
- Read : Gold Price Today : महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्याने दिला झटका; पहा, किती रुपयांनी वाढलेत भाव ?
- Gold : अर्र.. हे काय.. तुर्की आणि चीनमुळे वाढणार सोन्याच्या किंमती; कारण ऐकून तुम्ही होताल थक्क !
- Gold Price : आज सोन्याचे मीटर डाऊन; खरेदी करण्याआधी चेक करा काय आहेत भाव