Gold Price : सध्या सोन्याचे दर (Gold Price) कमी जास्त होत आहेत. गुरुवारी सोन्याच्या दरात घसरण झाली होती. शुक्रवारी मात्र दरात वाढ नोंदविण्यात आली. IBJA वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर 52 हजार 481 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा भाव 52 हजार 460 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला. अशा प्रकारे सोन्याच्या दरात 21 वाढ झाली आहे.
24 कॅरेट सोन्याचा भाव आज 52481 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्यासाठी आज 52271 रुपये मोजावे लागत आहेत. 21 कॅरेट शुद्धतेचे सोने 48073 रुपयांनी विकले जात आहे. तर 18 आणि 14 कॅरेटचा भाव अनुक्रमे 39361 रुपये आणि 30701 रुपये आहे. आज चांदीचा दर 58490 रुपये प्रति किलो आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी 58700 प्रति किलोवर बंद झाली होती. अशा प्रकारे आज चांदीचा दर (Silver Price) प्रति किलो 210 रुपये कमी झाला आहे.
तसे पाहिले तर आपल्या देशात सोन्याला कायमच मागणी असते. सण उत्सवाच्या काळात तर ही मागणीच आणखीच वाढते. त्यासाठी नेहमीच दुसऱ्या देशांकडून सोने आयात (Gold Import) करावी लागते. त्यामुळे जागतिक बाजारातील घडामोडींचा देशांतर्गत सोने चांदीच्या दरावर परिणाम होतो. जागतिक बाजार सोने आणि चांदीचे दर कमी किंवा जास्त झाले तर त्यानुसार देशांतर्गत बाजारपेठेतील दर निश्चित होतात. मध्यंतरी कोरोना (Corona) काळात सर्वकाही ठप्प होते. त्यावेळी सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी सोन्याने तर 56 हजारांचाही टप्पा पार केला होता. कारण, या काळात लोकांनी सुरक्षित गुंतवणूक (Investment) म्हणून सोने खरेदी केली होती. त्यामुळे या काळात सोन्याची मागणी वाढली होती. त्याचा परिणाम दरवाढीत दिसून आला. आता मात्र तशी परिस्थिती नाही. तरी देखील सोन्याचे भाव फारसे कमी झालेले नाहीत.