Gold Price : देशभरात सोने आणि चांदीच्या किंमती कमी होताना दिसत आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत (Gold Price) घसरण झाली असली तरी चांदी मात्र बळकट आहे. सोन्याचा भाव आज भारतात 7 महिन्यांच्या सर्वात कमी पातळीवर गेला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याची किंमत सुरुवातीच्या व्यापारात 0.21 टक्क्यांनी कमी झाली आहे. त्याचप्रमाणे चांदीवर (Silver Price) कालच्या बंद किमतीपेक्षा 0.30 टक्के कमी दिसत आहे.
गुरुवारी सकाळी 24 कॅरेट शुद्धतेचे सोने 105 रुपयांनी कमी होऊन 49 हजार 338 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. गुरुवारी फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा व्यवहार 49,314.00 रुपयांच्या पातळीवरून सुरू झाला. काही वेळाने किंमत 49,314 रुपयांच्या पातळीवर पोहोचली. पण, नंतर थोडी वाढ झाली आणि 49,338 रुपयांवर पोहोचले.
आज, मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदीच्या किमतीतही मंदी आहे. गुरुवारी चांदीचा दर 172 रुपयांनी घसरून 57,126 रुपये किलो झाला आहे. आज चांदीचा व्यवहार 56,961 रुपयांपासून सुरू झाला. काही काळानंतर किंमत वाढली आणि 57,126 रुपयांवर व्यवहार सुरू झाला. गुरुवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात नरमाई दिसून आली, तर चांदीच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. सोन्याच्या स्पॉट किमतीत आज 0.32 टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्याच वेळी चांदीचा दर 0.51 टक्क्यांनी बळकट झाला आहे. सोन्याचा भाव आज प्रति औंस $1,660.95 वर गेला आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत 19.39 डॉलर प्रति औंस झाली आहे.
बाजारातील तज्ज्ञांना सोन्यामध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. केडिया अॅडव्हायझरीचे संचालक आणि कमोडिटी तज्ज्ञ अजय केडिया सांगतात की, पुढील आठवड्यापासून सण उत्सवांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे बाजारपेठेतील ग्राहकांची संख्या वाढेल. या सणांना सोन्या-चांदीच्या विक्रीत मोठी वाढ होणार आहे. आजच्या किमतीवरून येणारी मागणी आणि वातावरण पाहिल्यास दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 51,000 ते 51,500 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो. डिसेंबरपर्यंत तो 52,000 चा टप्पा पार करू शकतो.