Gold Price : तुम्हाला सोने किंवा चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. शुक्रवारी भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) घसरण नोंदवण्यात आली. दहा ग्रॅम सोने 50,326 रुपयांवर आले आहे. एक किलो चांदीचे दरही (Silver Price) खाली आले असून आता 58,366 रुपये आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजने (HDFC Securities) ही माहिती दिली आहे.

दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव (Gold Price) 139 रुपयांनी घसरून 50,326 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोने 50 हजार 465 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते. सोन्याप्रमाणेच चांदीचा भावही (Silver Price) 363 रुपयांनी घसरून 58,366 रुपये प्रति किलो झाला. मागील व्यवहारात चांदी 58,729 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,665 डॉलर प्रति औंस तर चांदीचा भाव 19.50 डॉलर प्रति औंसवर स्थिर होता.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल म्हणाले, “अमेरिकन सेंट्रल बँक फेडरल रिजर्व्हने धोरणात्मक दरात वाढ केल्यामुळे मंदीची काळजी वाढत असतानाही सोन्याचे दर कमी झाले आहेत. बाजारातील तज्ज्ञांना सोन्यामध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. केडिया अॅडव्हायझरीचे संचालक आणि कमोडिटी तज्ज्ञ अजय केडिया सांगतात की, पुढील आठवड्यापासून सण उत्सवांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे बाजारपेठेतील ग्राहकांची संख्या वाढेल. या सणांना सोन्या-चांदीच्या विक्रीत मोठी वाढ होणार आहे. आजच्या किमतीवरून येणारी मागणी आणि वातावरण पाहिल्यास दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 51,000 ते 51,500 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो. डिसेंबरपर्यंत तो 52,000 चा टप्पा पार करू शकतो.

Share.

Leave A Reply

Exit mobile version