Goat Farming : तुम्हालाही मिळेल शेळीपालनासाठी 15 लाखांपर्यंत कर्ज, वाचा संपूर्ण माहिती

Goat Farming : हल्ली अनेकजण शेतीसोबत जोडव्यवसाय करतात. या व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगली कमाई करता येते. अनेकजण शेतीसोबत शेळीपालनाचा व्यवसाय करतात. जर तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल आणि तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्हाला आता शेळीपालनासाठी 15 लाखांपर्यंत कर्ज मिळेल. कसे ते जाणून घ्या.

तुम्हालाही मिळेल शेळीपालनासाठी कर्ज

शेळीपालनासाठी कर्ज उपलब्ध आहे, हे अनेकांना माहिती नाही. देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शेळीपालनासाठी कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एखाद्या शेतकरी किंवा बेरोजगार तरुणाला 20 शेळ्या पाळायच्या असल्यास आता त्यासाठी त्याला शासनाकडून कर्ज आणि अनुदान मिळेल.

त्यासाठी त्याला कोणत्या ठिकाणी शेळीपालन करायचे आहे, याची माहिती शेळीपालन प्रकल्प अहवालात द्यावी लागेल. तसेच ती जमीन त्याच्या मालकीची आहे की भाड्याने घेऊन शेती सुरू करणार? शेळीपालनासाठी किती जमीन वापरणार? शेळी घर बांधण्यासाठी किती खर्च येईल? यासारखी संपूर्ण माहिती त्याला द्यावी लागणार आहे.

मिळेल नाबार्डकडून कर्ज

शेळीपालनासाठी नाबार्डकडून कर्ज देण्यात येते. या कर्जाची परतफेड करण्यासाठी जास्तीत जास्त 15 वर्षांचा कालावधी निश्चित केला आहे. शेळीपालनासाठी शेतकरी जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेता येईल. याबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना नाबार्डच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. तसेच आपण पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत वेबसाइट आणि कार्यालयाशी संपर्क करू शकता.

आवश्यक प्रक्रिया

तुम्हाला कर्ज मिळविण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून प्रकल्प अहवाल मंजूर करावा लागणार आहे. त्यानंतर शेतकऱ्याला मंजूर प्रकल्प अहवाल त्याच्या बँकेत न्यावा लागणार आहे. सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची छाननी केल्यानंतरच बँक कर्ज देते हे लक्षात ठेवा.

इतर महत्वाची माहिती

एक शेळी पाळण्यासाठी 12 स्क्वेअर फूट जमीन तर 20 शेळ्यांसाठी 240 स्क्वेअर फूट जमीन गरजेची आहे. एका शेळीसाठी 15 चौरस फूट जमीन असावी. एका शेळीच्या पिल्लांसाठी 8 चौरस फूट जमीन असावी, तर 40 शेळीच्या पिल्लांसाठी 320 चौरस फूट जमीन गरजेची आहे. म्हणजेच शेळीपालनासाठी एकूण 575 चौरस फूट जागा लागेल. शेळ्यांसाठी घर बांधण्यासाठी 200 रुपये प्रति चौरस फूट जमिनीचा खर्च येईल.

Leave a Comment