Goa Business News : समुद्रकिनारा आणि बिअर (Beer) असं कॉम्बिनेशन (Combination) असलेलं गोवा राज्य (Goa State) पर्यटकांना (Tourists) नेहमीच खुणावत असतं. स्वस्त दरात मिळणाऱ्या मद्यामुळं अनेक या पर्यटक राज्यात येत असतात. अशातच दिवाळी (Diwali) आणि येणाऱ्या ३१ डिसेंबर (31st December) गोव्यात सुट्ट्या (Holiday) साजऱ्या करणाऱ्या मद्यप्रेमींना (Alcoholic love) आता बेअरसाठी (Beer) जास्त पैसे मोजावे लागणार आहे.
गोवा राज्य सरकारने (State Government of Goa) बिअरवरील उत्पादन शुल्कात (Excise duty) वाढ करण्याची घोषणा केली आहे. यामुळे बिअर ३० रुपयांपर्यंत महाग होऊ शकते. गोवा नेहमीच स्वस्त दारूसाठी ओळखला जातो. गोवा सरकारने बिअरवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर १० ते १२ रुपयांनी वाढ केल्याने राज्यात बिअर महाग होणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही दर वाढ जाहीर केली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर राज्यात बिअर १५ ते ३० रुपयांपर्यंत महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- Business News : आयएमएफने का दिला परकीय चलन साठा वाचवण्याचा सल्ला : वाचा सविस्तर
- World Student’s Day 2022: महान शास्त्रज्ञास स्मरण! ज्यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्यास नेहमीच केले प्रोत्साहित
- Honeymoon Destinations: हिल स्टेशनवर हनिमून साजरा करण्यासाठी “ही” ठिकाणे आहेत योग्य ठिकाणे
- Maharashtra Politics : “हम बेवफा हरगीज ना थे! पर हम वफा कर ना सके”, असे गात सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका
गोवा लिकर ट्रेडर्स असोसिएशनचे (Goa Liquor Traders’ Association) अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक (President Dattaprasad Naik) यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शुल्कवाढीनंतर लाईट बिअर (Light Beer) १५ रुपये प्रति बॉटल (Per Bottle), स्ट्राँग बिअर (Strong Beer) २०-२५ रुपये, तर महागडी बिअर (Expensive Beer) ३० रुपये प्रति बॉटल महागणार आहे.
गोवा नेहमीच इतर राज्यांच्या तुलनेत (Compare to other state) स्वस्त दारूसाठी (Low cost)ओळखला जातो. पण आता बिअरच्या दरात वाढ झाल्यानंतर पर्यटकांना गोव्यात बिअर पिण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. विदेशी दारूबाबत गोवा आता महाग झाल्याची विक्रेत्यांची तक्रार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दारूच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. अलीकडे गोव्यात दारूच्या विक्रीत ३० -४० टक्क्यांनी घट झाली आहे.