Girish Mahajan । धनगर उपोषणकर्त्यांबद्दल गिरीश महाजनांचे खळबळजनक विधान, व्हायरल झाली ऑडिओ क्लिप

Girish Mahajan । राज्यात मागील काही दिवसांपासून आरक्षणाचा मुद्दा पेटत चालला आहे. यामुळे राज्याचे राजकीय वातावरण तापत आहे. एकीकडे मराठा समाज तर दुसरीकडे ओबीसी समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. तर आता धनगर समाज देखील आरक्षणाची मागणी करत आहे.

अशातच आता राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. भाजप नेते रमेश कराड यांनी धनगर उपोषणकर्त्यांबाबत महाजनांकडे पाठपुरावा केला मात्र महाजन यांनी उपोषण सोडण्यासाठी येऊ शकत नाही, असे स्पष्ट केलं आहे.

“धनगर आरक्षणाच्या उपोषणाकडे डोळे-झाक करणाऱ्या पालकमंत्र्यांना लातूर जिल्ह्यात फिरू देणार नाही, ” असा गंभीर इशारा लातूरमधील धनगर बांधवांकडून देण्यात आला आहे. धनगर समाजाला एसटीमधून आरक्षणाची अंमलबजावणी करा, या मागणीसाठी मागील 10 दिवसापासून दोन धनगर बांधवांचे आमरण उपोषण सुरु आहे. या दरम्यान सोशल मीडियावर पालकमंत्री गिरीश महाजन आणि आमदार रमेश कराड यांच्यातील संवादाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान व्हायरल ऑडिओ क्लिपनुसार गिरीश महाजन हे उपोषणाकडे डोळेझाक करत आहे, असा मोठा आरोप धनगर बांधवांनी केला आहे. त्यामुळे आता अशा असंवेदनशील पालकमंत्र्याला लातूर जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा यावेळी धनगर बांधवांनी दिला आहे.

Leave a Comment