German Church : आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार जर्मनीतील हॅम्बर्ग येथे रात्री उशिरा चर्चमध्ये झालेल्या गोळीबारात 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
या गोळीबारात 8 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांबाबत अद्याप कोणतीही अचूक माहिती मिळालेली नाही. या संदर्भात हॅम्बर्ग पोलिसांनी ट्विट केले की, या गोळीबारात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. तेथे काही लोकांचा मृत्यू झाला आहे. आम्ही मोठ्या संख्येने सुरक्षा दलांसह घटनास्थळी उपस्थित आहोत.
यासंदर्भात पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास हल्लेखोरांनी चर्चमधील लोकांवर गोळीबार केला. मात्र, हल्लेखोर एक होते की एकापेक्षा जास्त हे अद्याप समजू शकलेले नाही.
या संदर्भात सीसीटीव्ही स्कॅन करण्यात येत असून या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.