Genesh Festival: पुणे: पुण्याची गणेशोत्सव (Pune Ganesh festival) परंपरा वैभवशाली आहेत. विसर्जन मिरवणुकीत देखील सर्वजण भेदभाव विसरून एकत्र येतात त्याचेच प्रदर्शन आजच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये झाले. भाजपचे नेते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि त्यांचे कट्टर विरोधक शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackerae) हे एकाच पालखीचे भोई झाले दोघांनीही एकाच ठिकाणी पालखी उचलून राजकीय मतभेद बाजूला ठेवले.
विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये फक्त सर्वसामान्यच नाही, तर राजकीय नेतेही सहभागी होत आहेत. एकीकडे राज्यात संघर्ष सुरु असताना मिरवणुकीत मात्र नेते मतभेद विसरुन एकत्र येताना दिसत आहे. असंच काहीसं चित्र पुण्यात आदित्य ठाकरे आणि चंद्रकांत पाटील आमने-सामने आल्यानंतर पहायला मिळालं. शिवसेना नेते आदित्य ठाकरे पुण्यात असून त्यांनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेत आरती केली. दुसरीकडे भाजपा नेते चंद्रकांत पाटीलदेखील पुण्यात असून यावेळी त्यांनी गणपतीचं दर्शन घेतलं. पुण्यातील Pune मानाचा पहिला कसबा गणपतीच्या Kasba Ganpati विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार होती तेव्हा आदित्य ठाकरे तिथे पोहोचले. यावेळी चंद्रकांत पाटील तिथेच उपस्थित होते. आदित्य ठाकरे गर्दीतून मार्ग काढत पालखीजवळ आले असता, चंद्रकांत पाटील यांनी त्यांना आधी दर्शन घेऊन येण्यास सांगितलं.
आदित्य ठाकरे दर्शन घेऊन आले तेव्हा पालखी मार्गस्थ होण्याच्या मार्गावर होती. चंद्रकांत पाटील आणि इतर जण आदित्य ठाकरेंची वाट पाहत थांबले होते. आदित्य ठाकरे येताच विसर्जनाला सुरुवात झाली. दरम्यान, यावेळी चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे एकमेकांशी गप्पा मारतानाही दिसले. विसर्जन मिरवणूक सुरू होताच कसबा गणपतीची पालखी उचलण्यात आली। त्यावेळी चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे हे दोघे पालखीच्या समोरच्या बाजूस येऊन दोघेजण भोई झाले. हे अनपेक्षित पणे घडलेले चित्र पाहून उपस्थित नाही हायसे वाटले. दरम्यान काही वेळापूर्वीच आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी हलवली आहे असे वक्तव्य केलेले असताना त्यानंतर अवघ्या काही मिनिटात दोन नेते एकत्र आल्याचे चित्र दिसले.