Gautam Gambhir : भारतीय संघात असे अनेक खेळाडू आहेत (Gautam Gambhir) जे त्यांच्या कामगिरीनुसार अधिक श्रेयास पात्र आहेत. पण त्यांना त्यांच्या कारकिर्दीत तेवढे क्रेडिट मिळाले नाही असे म्हणता येईल. रविचंद्रन अश्विनने (R. Ashwin) अशाच एका खेळाडूचे नाव दिले आहे ज्याला त्याच्या कारकिर्दीत इतके क्रेडिट मिळाले नाही. हर्षा भोगले यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान अश्विनने सांगितले की गौतम गंभीर (Gautam Gambhir) हा एक असा खेळाडू आहे ज्याला तितके क्रेडिट मिळाले नाही.
त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना अश्विन म्हणाला, “गौतम गंभीर हा भारताचा क्रिकेटपटू आहे. ज्याला नेहमीच कमी मानले गेले. तो संघाचा सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. पण त्याला जितके श्रेय द्यायला हवे तितके दिले गेले नाही. “तो एक निःस्वार्थी व्यक्ती होता जो आपल्या कारकिर्दीत नेहमी संघाचा विचार करत असे. अश्विन आताच गंभीरबद्दल असे का बोलला याचे उत्तर मिळणे सध्या तरी कठीण आहे. याआधी गौतम गंभीरने युवराज सिंहबद्दल असेच वक्तव्य केले होते. युवराज सिंहलाही हवे तितके क्रेडीट कधीच मिळाले नाही असे गंभीर म्हणाला होता.
गंभीरने दोन विश्वचषक जिंकले
गौतम गंभीरने 2007 च्या विश्वचषक फायनलमध्ये चांगली कामगिरी केली होती. पाकिस्तानविरुद्ध ओपनिंग करताना त्याने 54 चेंडूत 75 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये 8 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. गंभीरमुळेच टीम इंडियाने (Team India) पाकिस्तानविरुद्ध मोठी धावसंख्या उभारली. भारताला 2011 चा विश्वचषक जिंकून देण्यात गौतम गंभीरने महत्त्वाची भूमिका बजावली होती. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात गंभीरने कठीण परिस्थितीत 97 धावांची शानदार खेळी केली. या खेळीत त्याने 9 चौकार मारले. भारताने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा (Sri Lanka) पराभव करून विश्वचषक जिंकला.
गौतम गंभीरची कारकीर्द
गंभीरच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने भारतासाठी एकूण 242 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दरम्यान, 283 डावात त्याने 10324 धावा केल्या. गंभीरने कसोटीत 4154 धावा, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5238 आणि टी-20 क्रिकेटमध्ये 932 धावा केल्या आहेत.