Gautam Adani: मुंबई (Mumbai News): भारतीय उद्योगपति आणि अदानी समूहाचे अध्यक्ष (Adani Group Chairman) गौतम अदानी हे जगातील श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर घसरले आहेत. गुरुवारी त्यांची एकूण संपत्ती तब्बल ३.५१ अब्ज डॉलर्स म्हणजेच २८,५९९ कोटी रुपयांनी घसरली. त्यामुळे ब्लूमबर्ग अब्जाधीश (Bloomberg Billionaires Index) याच्या ताज्या निर्देशांकानुसार अदानी यांची एकूण संपत्ती आता $ १२८ अब्ज झाली आहे आणि ते फ्रान्सच्या बर्नार्ड अर्नॉल्ट (Bernard Arnault of France) यांच्या मागे पडले आहेत. अगोदर या यादीत अदानी दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले होते. पण शेअर बाजारातील घसरणीमुळे त्यांची एकूण संपत्ती सुमारे $ २० अब्जांनी घसरली.
- Gautam Adani News : अदानींची मोठी घोषणा..! ‘येथे’ करणार तब्बल 100 अब्ज डॉलर गुंतवणूक
- Health Tips: म्हणून सकाळी उठल्यानंतर ‘या’ गोष्टी टाळाव्यातच; वाचा महत्वाची कारणे
- MSME business बाबत झालीय महत्वाची घोषणा; पहा एफएम सितरामन यांनी काय म्हटलेय
दरम्यान, अॅमेझॉनचे जेफ बेझोस (Amazon’s Jeff Bezos) हे १३८ अब्ज डॉलर्ससह जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या आणि अर्नॉल्ट (१२९ अब्ज डॉलर) तिसऱ्या क्रमांकावर आहेत. टेस्लाचे सीईओ एलोन मस्क (Tesla CEO Elon Musk) हे $ २४० अब्ज संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर अजूनही आहेत. गुरुवारी 13.3 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीमध्ये मोठी घसरण झाली. गुरुवारी अदानी समूहाच्या (Adani Group) बहुतांश लिस्ट असणाऱ्या कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली. समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस (Adani Enterprises) तब्बल 2.17 टक्क्यांनी घसरली. यासह अदानी ट्रान्समिशन (Adani Transmission) 5.25 टक्के, अदानी टोटल गॅस (Adani Total Gas) 1.28 टक्के, अदानी ग्रीन एनर्जी (Adani Green Energy) 2.25 टक्के आणि अदानी पोर्ट्स 1.37 टक्क्यांनी घसरले आहेट. तर, अदानी पॉवर आणि अदानी विल्मार (Adani Power and Adani Wilmar) यांना किरकोळ फायदा झाला. दरम्यान, फ्रेंच कंपनी TotalEnergies म्हटले आहे की ते अदानी ग्रीन एनर्जीमधील किरकोळ हिस्सेदारी विकून नफा कमवू शकतात.