Adani Group : अदानी डेटा (Adani Data) नेटवर्क्स लिमिटेड (ADNL) ला युनिफाइड परवाना देण्यात आला आहे. या परवान्याद्वारे कंपनी देशात सर्व प्रकारच्या दूरसंचार सेवा देऊ शकते. या घडामोडीशी परिचित असलेल्या सूत्रांनी अदानी समूहाच्या (Adani Group) कंपनी ADNL ला एकात्मिक दूरसंचार परवाना (Integrated Telecom License) मंजूर झाल्याची माहिती दिली. सोप्या शब्दात सांगायचे तर, आता दूर अंतरावर कॉल करण्यासाठी आणि त्याच्या नेटवर्कवर इंटरनेट सेवा प्रदान करण्यास कंपनी पात्र आहे. हा परवाना मिळाल्यानंतर, कंपनी भविष्यात तिच्या 5G सेवांचा (5G Service) विस्तार करू शकते. अदानीच्या प्रवेशामुळे व्होडाफोन-आयडिया (Vodafone Idea) व्यतिरिक्त जिओ (Jio), एअरटेल (Airtel) यांसारख्या कंपन्यांसमोर नवीन आव्हान असेल.
या संदर्भात अधिकृत सूत्राने सांगितले की, “अदानी डेटा नेटवर्क्सला परवाना मिळाला आहे.” दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, सोमवारी परवाना जारी करण्यात आला. मात्र, या संदर्भात अदानी समूहाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. अदानी समूहाने नुकत्याच झालेल्या लिलावात स्पेक्ट्रम खरेदी करून देशातील दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केला. या स्पेक्ट्रमचा वापर समूहातील व्यावसायिक उपक्रमांसाठी करणार असल्याचे कंपनीने त्यावेळी सांगितले होते. ADNL ने नुकत्याच झालेल्या 5G स्पेक्ट्रम लिलावात 400 MHz स्पेक्ट्रम 20 वर्षांसाठी 212 कोटी रुपयांना विकत घेतले होते.
कंपनीचे भविष्यात काय नियोजन असेल याबाबत अद्याप काहीच स्पष्ट नाही. मात्र, जर कंपनीने दूरसंचार क्षेत्रात (Telecom Sector) प्रवेश केला तर बाजारातील अन्य दूरसंचार कंपन्यासाठी ते कठीण आव्हान असेल. यामुळे देशातील दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा आधिक वाढणार इतके मात्र नक्की. त्यामुळे आता कंपनी काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
- Must Read : Adani Group : अदानी समूहाच्या नावावर ही सिमेंट कंपनी होण्याची शक्यता
- म्हणून Gautam Adani यांना बसला झटका; पहा कितव्या नंबरवर झालीय घसरण
- Jio : एकदम स्वस्त प्लान..! फक्त 75 रुपयांत मिळवा ‘इतके’ फायदे; चेक करा डिटेल..